संरक्षण मंत्रालय
माजी सैनिक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांसाठी आर्थिक सहाय्यात 100% वाढ करण्यास संरक्षणमंत्र्यांनी दिली मंजुरी
प्रविष्टि तिथि:
15 OCT 2025 3:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2025
केंद्रीय सैनिक बोर्डामार्फत माजी सैनिक कल्याण विभागाने राबविलेल्या योजनांअंतर्गत माजी सैनिक (ईएसएम) आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबियांसाठी आर्थिक सहाय्यात 100% वाढ करण्यास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली आहे. मंजूर केलेली वाढ खालीलप्रमाणे आहे:
आर्थिक सहाय्य (Penury Grant )प्रति लाभार्थी प्रति महिना 4,000 रुपयांवरून 8,000 रुपये करण्यात आले असून वृद्ध आणि पेन्शन नसलेले माजी सैनिक आणि नियमित उत्पन्न नसलेल्या 65 वर्षांवरील त्यांच्या विधवांना शाश्वत आजीवन मदत प्रदान करण्यात येत आहे.
अवलंबून असलेल्या दोन मुलांसाठी (इयत्ता पहिली ते पदवी) किंवा दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकणाऱ्या विधवांसाठी प्रति व्यक्ती प्रति महिना शिक्षण अनुदान 1,000 रुपयांवरून 2,000 रुपये करण्यात आले आहे.
विवाह अनुदान प्रति लाभार्थी 50,000 रुपयांवरून 1,00,000 रुपये करण्यात आले आहे. हे आदेश जारी झाल्यानंतर झालेल्या विवाहांसाठी माजी सैनिकांच्या दोन मुलींसाठी आणि विधवा पुनर्विवाहासाठी हे लागू आहे.
सुधारित दर 1, नोव्हेंबर 2025 नंतर सादर केलेल्या अर्जांसाठी लागू असतील , ज्यासाठी AFFDF मधून अंदाजे 257 कोटी रुपयांचा वार्षिक वित्तीय भार उचलला जाईल. या योजनांना संरक्षण मंत्री माजी सैनिक कल्याण निधीद्वारे निधी दिला जातो, जो सशस्त्र सेना ध्वज दिन निधी (AFFDF) चा एक उपसंच आहे.
या निर्णयामुळे निवृत्तीवेतन नसलेले माजी सैनिक, विधवा आणि अल्प -उत्पन्न गटातील अवलंबून असलेल्या कुटुंबियांसाठी सामाजिक सुरक्षा जाळे मजबूत होते, जे माजी सैनिकांच्या सेवा आणि बलिदानाचा सन्मान करण्याप्रति सरकारच्या वचनबद्धतेला दुजोरा देते.
सोनल तुपे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2179387)
आगंतुक पटल : 116