संरक्षण मंत्रालय
भारतीय लष्कराची तुकडी ऑस्ट्राहिंद संयुक्त लष्करी सरावासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना
Posted On:
12 OCT 2025 4:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2025
भारतीय लष्कराची 120 जवानांची तुकडी भारत-ऑस्ट्रेलिया संयुक्त लष्करी सराव 'ऑस्ट्राहिंद 2025' च्या चौथ्या पर्वात सहभागी होण्यासाठी काल ऑस्ट्रेलियातील पर्थ येथील आयर्विन बॅरेक्स येथे रवाना झाली. हे सराव सत्र 13 ते 26 ऑक्टोबर 2025 दरम्यान आयोजित केले जाणार आहे.
भारतीय लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व गोरखा रायफल्सच्या बटालियनसह इतर शस्त्रास्त्रे आणि सेवांच्या तुकड्या करत आहेत.
वार्षिक सराव ऑस्ट्राहिंद 2025 हा लष्करी सहकार्य वाढवणे, परस्पर कार्यक्षमता सुधारणे आणि शहरी/निमशहरी भूभागात उप-पारंपारिक युद्धाच्या क्षेत्रात रणनिती, तंत्रे आणि प्रक्रियांची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने सहभाग घेत असलेल्या सैन्यांना एक व्यासपीठ प्रदान करणे हे आहे.
हा सराव खुल्या आणि अर्ध वाळवंट भूभागात कंपनी स्तरावरील संयुक्त कार्यान्वयनावर लक्ष केंद्रित करेल, ज्यामध्ये सैन्याच्या तुकड्या संयुक्त नियोजन, सामरिक कवायती आणि विशेष शस्त्र कौशल्यांशी संबंधित मोहिमांमध्ये सहभाग घेतील. कार्यान्वयन क्षमता वाढवण्यासाठी, उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करण्यासाठी आणि लढाऊ वातावरणात संयुक्तपणे कार्य करण्यासाठी यामुळे एक अमुल्य संधी प्रदान केली जाणार आहे.
ऑस्ट्राहिंद 2025 सरावातील सहभागामुळे संरक्षण सहकार्य आणखी मजबूत होईल आणि भारतीय आणि ऑस्ट्रेलियन लष्करी सैन्यांमधील सौहार्द वाढेल, ज्यामुळे सहकार्य आणि परस्पर विश्वासाची भावना अधिक दृढ होईल.

* * *
सुषमा काणे/संदेश नाईक/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2178097)
Visitor Counter : 27