राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गुजरात दौऱ्यावर, सोमनाथ मंदिरात दर्शन घेऊन केली पूजा, गिर राष्ट्रीय उद्यानाला दिली भेट आणि स्थानिक आदिवासी लोकांशी साधला संवाद
Posted On:
10 OCT 2025 9:33PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (10 ऑक्टोबर 2025) गुजरात दौऱ्यावर आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमनाथ मंदिरात दर्शन आणि पूजा करून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली. राष्ट्रपतींनी मंदिराजवळील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली.

त्यानंतर राष्ट्रपतींनी गिर राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली तसेच सासन गिर येथील स्थानिक आदिवासी लोकांशी संवाद साधला.

आदिवासी लोकांसाठी आयुष्यात प्रगतीची अनेक कवाडे खुली असल्याचे राष्ट्रपती यावेळी झालेल्या संवादादरम्यान म्हणाल्या. आपल्या मुलांना शक्य तितके उत्तम शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्याचा सल्ला त्यांनी दिला. एक आदिम आदिवासी गट असलेल्या सिद्दी आदिवासी समुदायाचा साक्षरता दर 72 टक्क्यांहून अधिक आहे हे पाहून आनंद झाल्याचे त्यांनी सांगितले.

आदिवासी जमातीच्या क्षेमकल्याणासाठी केंद्र सरकारने अनेक उपक्रम सुरु केले आहेत, असे राष्ट्रपती म्हणाल्या. सर्वानी या विकासात्मक आणि कल्याणकारी योजनांची माहिती घ्यावी, त्यांचा लाभ घ्यावा आणि आपल्या गावातील आणि समुदायातील इतर लोकांना त्या योजनांशी जोडण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
आदिवासी समुदायाची निसर्ग स्नेही जीवनशैली सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्या म्हणाल्या.

आपल्या आदिवासी बंधू आणि भगिनींच्या सक्रिय सहभागातून आपण एका अशा समाजाची आणि राष्ट्राची उभारणी करण्यासाठी काम करत आहोत, जिथे समानता, न्याय आणि आदराचे वातावरण असेल, जिथे आदिवासी समाजाची संस्कृती आणि परंपरा जतन केल्या जातील आणि आपल्या आदिवासी बंधू-भगिनींचे हक्क संरक्षित असतील, असे राष्ट्रपतींनी सांगितले. भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
***
सुषमा काणे / भक्ती सोनटक्के / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2177648)
Visitor Counter : 11