कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ई-नाम मंचाचा विस्तार: भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल कृषी-व्यापार मंचाला चालना देण्यासाठी 9 नवीन वस्तूंचा समावेश


ई-नाम प्लॅटफॉर्मवरील वस्तूंची संख्या वाढून 247 झाली, ज्यामुळे व्याप्ती आणखी वाढली आणि शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी नवीन संधी निर्माण झाल्या आहेत

प्रविष्टि तिथि: 08 OCT 2025 9:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2025

केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 9 अतिरिक्त वस्तूंचा समावेश करून राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) ला आणखी बळकटी दिली आहे, यामुळे या मंचावर व्यापार करण्यायोग्य कृषी मालांची एकूण संख्या 247 झाली आहे. शेतकरी, व्यापारी आणि इतर भागधारकांकडून व्यापक वस्तू समावेश आणि बाजार एकीकरणासाठी सातत्याने होत असलेल्या मागणीला प्रतिसाद म्हणून हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

या उपक्रमाचा उद्देश शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी भारतातील बाजारपेठांना जोडणाऱ्या पारदर्शक आणि स्पर्धात्मक डिजिटल ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळवून देऊन संधी वाढवणे हा आहे.

ई-नामवर व्यापार केल्या जाणाऱ्या वस्तूंसाठी व्यापार करण्यायोग्य मापदंड तयार करण्याची जबाबदारी विपणन आणि तपासणी संचालनालयावर सोपवण्यात आली आहे. संचालनालयाने राज्य संस्था, व्यापारी, विषय तज्ञ आणि एसएफएसी यांच्याशी व्यापक सल्लामसलत केल्यानंतर आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या संमतीनंतर या 9 नवीन वस्तूंसाठी मापदंड विकसित केले आहेत.

व्यापार करण्यायोग्य मापदंड सुनिश्चित करतात की शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाच्या खऱ्या गुणवत्तेनुसार भाव मिळेल जेणेकरून दलालांवरील अवलंबित्व कमी होईल आणि त्यांची सौदेबाजी करण्याची शक्ती मजबूत होईल. हा उपक्रम पारदर्शक व्यापार परिसंस्थेला चालना देतो , शेतकऱ्यांचे हित जपतो आणि भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेच्या दीर्घकालीन वाढीस हातभार लावतो.

आतापर्यंत, विपणन आणि तपासणी संचालनालयाने ई-नाम प्लॅटफॉर्मवर व्यापार केल्या जाणाऱ्या 238 कृषी वस्तूंसाठी व्यापार योग्य मापदंड तयार केले आहेत. 9 नवीन वस्तूंच्या समावेशामुळे ही संख्या 247 पर्यंत वाढेल, ज्यामुळे प्लॅटफॉर्मची पोहोच आणि प्रभाव वाढेल. समाविष्ट 9 नवीन वस्तू पुढीलप्रमाणे आहेत:

1.ग्रीन टी

2. चहा

3. अश्वगंधाची सुकलेली मुळे

4. मोहरीचे तेल

5. लॅव्हेंडर तेल

6. मेंथा तेल

7. व्हर्जिन ऑलिव्ह तेल

8. लॅव्हेंडर सुकी फुले

9. ब्रोकन राईस

व्यापारयोग्य मापदंड वस्तूंसाठी प्रमाणित ग्रेड किंवा श्रेणी सादर करतात, किंमती थेट गुणवत्तेशी जोडतात आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळविण्यास मदत करतात.

ई-नाम पोर्टलवर (enam.gov.in) आता नव्याने मंजूर झालेल्या व्यापारयोग्य मापदंड उपलब्ध झाल्यामुळे हा प्लॅटफॉर्म पारदर्शक, गुणवत्ता-संचालित बाजारपेठ म्हणून आपली भूमिका आणखी मजबूत करतो. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना व्यापक बाजारपेठांपर्यंत पोहोचण्यासाठी, किफायतशीर दर मिळवण्याच्या आणि खात्रीशीर गुणवत्ता मानकांचा लाभ घेण्याच्या संधी खुल्या होतात , ज्यामुळे त्यांची आर्थिक लवचिकता वाढते.

हा निर्णय पारदर्शक डिजिटल साधनांसह शेतकऱ्यांना सक्षम बनवणे , गुणवत्ता-संचालित व्यापाराला प्रोत्साहन देणे आणि कृषी क्षेत्रात समावेशक वाढ सुनिश्चित करण्याचा केंद्र सरकारचा संकल्प अधोरेखित करतो.

निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(रिलीज़ आईडी: 2176587) आगंतुक पटल : 27
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Telugu , Malayalam