शिक्षण मंत्रालय
विकसित भारत बिल्डथॉन 2025 ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी तरुण नवोन्मेषकांना “आत्मनिर्भर भारतासाठी बिल्डथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरित केले ”
Posted On:
07 OCT 2025 9:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2025
शिक्षण मंत्रालय आणि नीती आयोग अंतर्गत अटल इनोव्हेशन मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विकसित भारत बिल्डथॉन 2025 ला देशभरातील विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, सुमारे 2.5 लाख शाळांमधील विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत. ही भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी नवोन्मेष चळवळ असून विकसित भारत 2047 चे स्वप्न साकारण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल आहे.
या उपक्रमाला प्रोत्साहन देताना भारतीय हवाई दलाचे टेस्ट पायलट, आणि इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) चे अंतराळवीर तसेच विकसित भारत बिल्डथॉनचे ब्रँड अॅम्बेसेडर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी आपल्या व्हिडिओ संदेशाद्वारे विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी होऊन आत्मनिर्भर भारत घडविण्यात योगदान देण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी सांगितले की, बिल्डाथॉन हे इयत्ता 6 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी सर्जनशीलता प्रदर्शित करण्याचे अद्वितीय व्यासपीठ आहे. प्रत्येक कल्पना – लहान असो किंवा मोठी, ती कल्पना विकसित भारताच्या निर्मितीस हातभार लावू शकते. विद्यार्थ्यांनी नवोन्मेषी विचार करावा, आणि वोकल फॉर लोकल तसेच स्वदेशीच्या क्षमतेचा उपयोग करत वास्तव जीवनातील समस्यांवर उपाय शोधणारी प्रोटोटाइप्स विकसित करावीत, असे त्यांनी नमूद केले.
शाळा त्यांच्या प्रवेशिका फोटो आणि व्हिडिओ स्वरूपात सादर करतील, ज्यांचे मूल्यमापन तज्ज्ञ समितीद्वारे केले जाईल. विजेत्या संघांना रुपये 1 कोटींच्या बक्षीस निधीतून पारितोषिके दिली जातील.
नोंदणी येथे करा : http://vbb.mic.gov.in
सुषमा काणे/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2176051)
Visitor Counter : 3