संरक्षण मंत्रालय
युद्धभूमी बदलली आहे, भविष्यातील युद्धे अल्गोरिदम, स्वायत्त प्रणाली आणि एआय वापरून लढली जातील; ड्रोन,अँटी-ड्रोन प्रणाली, क्वांटम संगणन आणि निर्देशित-ऊर्जा शस्त्रे भविष्य ठरवतील : संरक्षण मंत्री
Posted On:
07 OCT 2025 2:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2025
"युद्धभूमी बदलली आहे. भविष्यातील युद्धे अल्गोरिदम, स्वायत्त प्रणाली आणि कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे लढली जातील. ड्रोन, ड्रोनविरोधी प्रणाली, क्वांटम संगणन आणि निर्देशित-ऊर्जा शस्त्रे भविष्य ठरवतील. ऑपरेशन सिंदूरमध्येही आपण असेच एक प्रात्यक्षिक अनुभवले," असे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. 7 ऑक्टोबर 2025 रोजी विज्ञान भवन येथे राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनापूर्वी 'रक्षा नवाचार संवाद: आयडेक्स स्टार्टअप्सशी संवाद' या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी नवोन्मेषकांना विद्यमान उपायांच्या पलीकडे विचार करण्याचे आणि युद्धाची पुनर्परिभाषा करणारे तंत्रज्ञान विकसित करण्याचे आवाहन केले. "तंत्रज्ञानात आपण अनुकरण करणारे किंवा अनुयायी बनून राहू नये, आपण जगासाठी सर्जक आणि मानक स्थापित करणारे बनले पाहिजे," असेही त्यांनी नमूद केले.
YKMZ.jpg)
आज भारतात 100 हून अधिक युनिकॉर्न आहेत, परंतु संरक्षण क्षेत्रात एकही नाही हे अधोरेखित करताना स्टार्टअप्सना मोठी उद्दिष्टे ठेवण्यास प्रोत्साहित करून हे चित्र बदलण्याचे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले. "भारताचा पहिला डिफेन्स युनिकॉर्न तुमच्यामधून उदयास येऊ द्या. ही केवळ तुमच्यासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट असेल," याकडे त्यांनी लक्ष वेधले.

गेल्या आर्थिक वर्षात संरक्षण उत्पादनात 1.5 लाख कोटी रुपयांचे विक्रमी यश आणि 23,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निर्यात करण्यात योगदान देणाऱ्या नवोन्मेषकांच्या सामूहिक प्रयत्नांचे संरक्षणमंत्र्यांनी कौतुक केले.
PLCI.jpg)
ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांच्या भूमिकेसाठी सन्मानित झालेल्या रेफी एम. फायबर आणि ग्रॅव्हिटी सिस्टीम्स सारख्या आयडेक्स विजेत्यांच्या कामगिरीचे कौतुक करताना राजनाथ सिंह यांनी निदर्शनास आणले की भारतीय स्टार्टअप्सनी विकसित केलेले नवोन्मेष आता जागतिक स्तरावर वाखाणले जात आहेत. “आपले सैनिक स्वतःच्या मायभूमीतून साकारलेल्या नवोन्मेषाला सलाम करतात तेव्हा ती खूप अभिमानास्पद बाब आहे. अनेक भारतीय स्टार्टअप्स आता दुबई एअरशो 2025 सारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर त्यांच्या परिवर्तनकारी तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करत आहेत. जग भारताच्या नवोन्मेष कौशल्याची दखल घेत आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

सुषमा काणे/वासंती जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2175798)
Visitor Counter : 11