वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारत-कतार द्विपक्षीय व्यापार वर्ष 2030 पर्यंत दुप्पट होऊ शकतो : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल
भारत आणि कतारच्या वाणिज्य मंत्र्यांनी दोहा येथे संयुक्त व्यापार परिषदेच्या बैठकीला केले संबोधित
Posted On:
06 OCT 2025 2:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर 2025
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल 6–7 ऑक्टोबर 2025 रोजी कतारच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. कतारचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री शेख फैसल बिन थानी बिन फैसल अल थानी यांच्यासमवेत भारत-कतार संयुक्त आर्थिक आणि वाणिज्यिक सहकार्य आयोगाच्या बैठकीचे सह अध्यक्षस्थान भूषविण्यासाठी ते या दौऱ्यावर आहेत.
दोन्ही देशांच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांची द्विपक्षीय बैठकही झाली असून यात दोन्ही नेत्यांनी एकूण व्यापार आणि आर्थिक संबंधांचा आढावा घेतला, विद्यमान व्यापार अडथळ्यांवरील तोडग्यांबाबत विचारविनिमय केला आणि वित्त, कृषी, आरोग्यसेवा इत्यादी क्षेत्रांमध्ये सहकार्यासाठी नवीन संधींबाबत चर्चा केली.
दोन्ही बाजूंनी महत्त्वाकांक्षी भारत-कतार व्यापक आर्थिक भागीदारी करार पुढे नेण्याच्या आपल्या सामायिक वचनबद्धतेची पुष्टी केली. वर्ष 2028 पासून दरवर्षी 7.5 दशलक्ष टन एलएनजी पुरवठा करारासह कतारच्या ऊर्जा निर्यातीचे कौतुक करताना, गोयल यांनी कतारला भारताची निर्यात वाढवण्याची गरज अधोरेखित केली.
गोयल यांनी कतारच्या पहिल्या भेटीत, उत्साही भारतीय समुदायाला संबोधित केले आणि भारत-कतार संबंधांचा एक मजबूत आधारस्तंभ म्हणून त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले. कतारच्या विकासात आणि भारताच्या वाढत्या आर्थिक सामर्थ्यात भारतीय समुदायाच्या महत्त्वपूर्ण योगदानाचे कौतुक त्यांनी केले. जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचा उदय आणि 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याच्या संकल्पावर त्यांनी भर दिला. समावेशकता, नवोन्मेष आणि जागतिक सहकार्यासाठी भारताच्या वचनबद्धतेची पुन्हा एकदा पुष्टी करत, गोयल यांनी भारतीय समुदायाला दोन्ही राष्ट्रांमधील एक महत्त्वाचा सेतू म्हणून आणि भारताच्या विकासाच्या दृष्टिकोनाला साकार करण्यासाठी प्रमुख भागीदार म्हणून कार्य करत राहण्याचे आवाहन केले.
सुवर्णा बेडेकर/सोनाली काकडे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2175740)
Visitor Counter : 19