नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

“भारतीय ध्वज असलेले व्हीएलजीसी शिवालिकच्या आगमनासह भारत सागरी 'आत्मनिर्भरते'ला बळकटी देत आहे”: सर्बानंद सोनोवाल


“तेल क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम 112 जहाजांची बांधणी करतील, 2047 पर्यंत 350 अब्ज डॉलर्स परकीय चलनाची करणार बचत:” सर्बानंद सोनोवाल

Posted On: 06 OCT 2025 10:26PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 ऑक्‍टोबर 2025

 

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री  सर्बानंद सोनोवाल यांनी भारतीय ध्वज असलेले  देशातील तिसरे भव्य  गॅस कॅरियर (व्हीएलजीसी) “शिवालिक”चे स्वागत केले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सागरी अमृत काल व्हिजन  2047 अंतर्गत कल्पना केलेल्या  भारताच्या सागरी पुनरुत्थान आणि ऊर्जा सुरक्षेतील हा एक अभिमानास्पद टप्पा आहे.

विशाखापट्टणम बंदरात जहाजाचे स्वागत करताना सोनोवाल म्हणाले की, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडून 'शिवालिक'चा समावेश हे जहाज बांधणी क्षेत्रात भारताच्या 'आत्मनिर्भरतेच्या ' (स्वयंपूर्णता ) वाढत्या क्षमतेचे आणि जागतिक ऊर्जा व्यापारात भारताच्या वाढत्या सहभाग प्रतिबिंबित करतो.

"आपल्या राष्ट्रीय ध्वजाखाली शिवालिकचे आगमन हा केवळ ताफ्याचा विस्तार नाही तर दूरदर्शी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या सागरी पुनरुत्थानावरील विश्वासाचे आणि एक प्रमुख  जागतिक सागरी राष्ट्र म्हणून आपल्या वाढत्या सामर्थ्याचे प्रतीक आहे," असे. सर्वानंद सोनोवाल म्हणाले. "हे आपले प्रिय पंतप्रधान मोदी यांनी भारतासाठी कल्पना केलेल्या लवचिकता, क्षमता आणि 'आत्मनिर्भरतेचे' हे प्रतीक आहे. हा उपक्रम विकसित भारताच्या दिशेने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी एक मजबूत, स्वयंपूर्ण  आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक जहाजबांधणी  क्षेत्र निर्माण करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेला बळकटी देतो."

हिमालयीन पर्वतरांगांच्या नावावरून नाव देण्यात आलेले 82,000  सीबीएम व्हीएलजीसी शिवालिक हे जहाज  10 सप्टेंबर 2025 रोजी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या  ताफ्यात समाविष्ट करण्यात आले आणि तिसरी व्हीएलजीसी म्हणून सह्याद्री आणि आनंदमयी बरोबर  सामील झाले. दक्षिण कोरियामध्ये बांधणी केलेले 225 मीटर लांबीचे हे जहाज अत्याधुनिक सागरी अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचे प्रतिनिधित्व करते ज्यामध्ये स्वतंत्र  टाक्या, प्रगत तापमान नियंत्रण आणि जागतिक सुरक्षा आणि कार्यक्षमता मानकांचे पालन समाविष्ट आहे.

‘शिवालिक’ ने यूएईच्या रुवैस येथे 46,000 मेट्रिक टनांहून अधिक प्रोपेन आणि ब्युटेनचा समावेश असलेले द्रवीकृत पेट्रोलियम गॅस (एलपीजी) वाहून नेत आपला पहिला प्रवास पूर्ण केला. त्यानंतर ते इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) च्या डिस्चार्ज ऑपरेशनसाठी विशाखापट्टणम येथे दाखल झाले.

मंत्रालयाने म्हटले आहे की भारतीय ध्वजाखाली जहाजाच्या आगमनाला "अतिशय धोरणात्मक महत्त्व" आहे कारण ते अरबी आखाताशी भारताची ऊर्जा कनेक्टिव्हिटी मजबूत करते आणि देशात सुरक्षित, कार्यक्षम आणि विश्वासार्ह एलपीजी वाहतूक सुनिश्चित करते.

“शिवालिकचे आगमन म्हणजे सागरी स्वावलंबन आणि सामर्थ्याच्या दिशेने सुरु असलेल्या भारताच्या घोडदौडीचे प्रतीक आहे. एकत्रितपणे, आपण भारताच्या सागरसंबंधीच्या भाग्यात नवा अध्याय लिहितो आहोत – एक असा अध्याय जो अभिमानी तिरंग्याखाली आत्मविश्वासाने, धैर्याने आणि निश्चिंततेने नौकानयन करतो.”

“भारतीय नौवहन महामंडळ (एससीआय) सध्या तेलविषयक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांशी सहकार्यासह काम करत असून 112 जहाजांची एकत्रित मागणी पूर्ण करून दीर्घकालीन ताफा विस्तारासाठी संयुक्त उपक्रम (जेव्ही) स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे. हा उपक्रम परदेशी नौकानयन कंपन्यांना मालवाहतुकीचे शुल्क म्हणून दर वर्षी दिल्या जाणाऱ्या 75 अब्ज डॉलर्सच्या परदेशी चलनाची बचत करण्याच्या देशाच्या प्रयत्नात योगदान देईल,” केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी ग्वाही दिली. त्याचप्रमाणे, ड्राय बल्क घटकाला बळकट करणे हे एससीआयच्या पोलाद क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांशी झालेल्या भागीदारीचे उद्दिष्ट असून, भारत कंटेनर शिपिंग लाईन (बीसीएसएल)स्थापन करण्याची महामंडळाची योजना कंटेनर शिपिंग क्षेत्रात भारताच्या पदचिन्हांना अधिक चालना देईल आणि त्यायोगे निर्यात-आयात विषयक कार्यक्षमता आणि स्पर्धात्मकतेमध्ये वाढ होईल.

केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्यासह विशाखापट्टणम येथील खासदार माथुकुमिली श्रीभारत, आमदार (दक्षिण विशाखापट्टणम) च.वामसी कृष्ण श्रीनिवास, विशाखापट्टणम बंदर प्राधिकरणाचे (व्हीपीए) अध्यक्ष माधैयन अंगमुथू तसेच एससीआयचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कॅप्टन बी.के. त्यागी यांच्या उपस्थितीत या जहाजाचा स्वीकार समारंभ झाला. एससीआय आणि व्हीपीए मधील अनेक ज्येष्ठ अधिकारी देखील याप्रसंगी उपस्थित होते.

शिवालिक जहाजाचे मुख्य, कॅप्टन भास्कर टंडन आणि चीफ ऑफिसर विवेक त्यागी यांच्यातर्फे उपस्थित मान्यवरांना जहाजाच्या दिशादर्शक सेतू आणि कार्गो नियंत्रण कक्षाची मार्गदर्शित सफर घडवण्यात आली. यातून भारतीय ध्वजाच्या अधिपत्याखालील नौवहनाला पाठबळ देणे आणि जागतिक सागरी क्षेत्रात देशाची उपस्थिती बळकट करणे याप्रति सरकारची कटिबद्धता यातून अधोरेखित होते.

वेगवेगळ्या टाक्या आणि प्रगत तापमान व्यवस्थापन प्रणालींसह सुसज्ज असलेले शिवालिक जहाज अत्याधुनिक सागरी अभियांत्रिकी आणि परिचालनात्मक कार्यक्षमतेचे प्रतिनिधित्व करते. कॅप्टन त्यागी म्हणाले की भारतीय मालवाहक क्षमतेचा विस्तार करून परदेशी वाहकांवरील अवलंबित्व कमी करणे तसेच परिचालनात्मक विश्वासार्हता आणि खर्चविषयक कार्यक्षमता यांचा विस्तार करण्यासाठी एससीआय तेलसंबंधी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसह एकत्र येऊन काम करत आहे.

एससीआयच्या ताफ्यात सध्या स्वतःची 58 जहाजे असून त्यांचे एकूण डेड वेट टनेज  5.26 दशलक्ष आहे. कच्चे तेल वाहक, उत्पादनांचे टंकर्स, बल्क वाहक, कंटेनर जहाजे, एलपीजी वाहक आणि ऑफशोअर मदत करणारी जहाजे यांसह विविध प्रकारच्या जहाजांचा यात समावेश आहे.

 

* * *

शैलेश पाटील/सुषमा काणे/संजना चिटणीस/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2175612) Visitor Counter : 9
Read this release in: Hindi , Assamese , English , Urdu