पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 24 नोव्हेंबर रोजी 'ओडिशा पर्व 2024' मध्ये सहभागी होणार
Posted On:
23 NOV 2024 7:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5.30 वाजता नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आयोजित 'ओडिशा पर्व 2024' कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी ते उपस्थितांना संबोधितही करतील. ओडिशा पर्व हा दिल्लीतील ओडिया समाज या संस्थेने आयोजित केलेला प्रमुख कार्यक्रम आहे. या माध्यमातून ते ओडिया वारशाच्या जतन आणि संवर्धनासाठी मोलाची मदत करत आहेत. ही परंपरा पुढे नेत, या वर्षी 22 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत ओडिशा पर्व आयोजित केले जात आहे. यात ओडिशाच्या समृद्ध वारश्याचे दर्शन पहायला मिळेल. ज्यात रंगीबेरंगी सांस्कृतिक स्वरूपांचे आणि राज्यातील चैतन्यशील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय मूल्यांचे प्रदर्शन होईल. विविध क्षेत्रातील प्रख्यात तज्ञ आणि प्रतिष्ठित व्यावसायिकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय चर्चासत्र किंवा परिषद देखील आयोजित केली जाणार आहे.
* * *
आशिष सांगळे/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2175365)
अभ्यागत कक्ष : 16
Read this releasein:
Odia
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam