जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जलशक्ती मंत्रालयाच्या जल संसाधन, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाकडून स्वच्छता आणि प्रलंबित बाबींच्या निपटाऱ्याकरिता विशेष मोहीम 5.0 चे आयोजन

Posted On: 06 OCT 2025 2:04PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 ऑक्‍टोबर 2025

 

स्वच्छता संस्थात्मक करण्यासाठी आणि सरकारी कार्यालयांमधील प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करण्यासाठी 2 ऑक्टोबर 2025 ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत विशेष मोहीम 5.0 राबविण्यात येत आहे. ही मोहीम विभागात दोन टप्प्यात राबविली जात आहे, म्हणजे (i) 15 ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत तयारीचा टप्पा आणि (ii) 2 ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत अंमलबजावणीचा टप्पा. विशेष मोहीम राबविण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

  

जल संसाधन, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाचे सचिव व्ही.एल. कांथा राव यांनी 12 सप्टेंबर 2025 रोजी विभागाच्या सर्व शाखा/विभागांच्या प्रमुखांसह तसेच विभागाच्या विविध संघटनांच्या प्रमुखांसह विशेष मोहीम 5.0 बाबत एक बैठक घेतली. या बैठकीत प्रत्येक उपक्रमासाठी निश्चित केलेल्या लक्ष्यांसह पूर्वतयारी विषयक कार्याचा आणि हाती घेण्याच्या उपक्रमांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. मोहिमेत सक्रीय  सहभागी होण्यासाठी आणि मोहिमेच्या कालावधीत लक्ष्ये साध्य करण्यासाठी सर्व शाखा/विभाग/संघटना यांना सूचना देण्यात आल्या.

  

गांधी जयंतीनिमित्त  व्ही.एल. कांथा राव यांनी नवी दिल्लीतील हौज खास येथील सेंट्रल सॉइल अँड मटेरियल्स रिसर्च स्टेशन (सीएसएमआरएस मुख्यालय) येथे राष्ट्रपिता महात्मा गांधींना पुष्पांजली वाहिली, त्यानंतर परिसरात स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमात 02.10.2025 रोजी स्वच्छता अभियानासाठी विशेष मोहीम 5.0 ची सुरुवात देखील करण्यात आली.

Targets fixed for Main (Implementation Phase) of Special Campaign 5.0 i.e. 2nd October – 31st October, 2025 are as follows:

Sl. No.

Parameters

Targets

  1.  

No. of Physical Files to be reviewed

15,405

  1.  

No. of e-Files to be reviewed

8,119

  1.  

No. of Cleanliness sites to be conducted

563

  1.  

MP References

135

  1.  

PMO References

41

  1.  

Public Grievances

135

  1.  

PG Appeals

22

  1.  

Parliamentary Assurances

32

  1.  

IMC References (Cabinet Note only)

03

  1.  

Ease of Rules to be modified / amended

03

 

* * *

निलिमा चितळे/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2175288) Visitor Counter : 10