पंतप्रधान कार्यालय
दार्जिलिंग परिसरातल्या पाऊस आणि भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे मदतीचे आश्वासन
Posted On:
05 OCT 2025 4:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दार्जिलिंग आणि आसपासच्या भागात मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
पंतप्रधानांनी बाधित प्रदेशांना सर्वतोपरी मदत पुरवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि या नैसर्गिक आपत्तीचा प्रभाव कमी करण्यासाठी केंद्र व राज्य एजन्सी यांच्या समन्वित प्रयत्नांवर भर दिला.
मोदी यांनी ‘एक्स’ वर पोस्ट लिहिली आहे:
“मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्या दार्जिलिंग आणि आसपासच्या भागातील परिस्थितीवर अधिकारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत. माझ्या संवेदना शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा.”
* * *
निलिमा चितळे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2175046)
Visitor Counter : 7
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada