उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दार्जिलिंगमधील जीवितहानीबद्दल उपराष्ट्रपतींकडून शोक व्यक्त

Posted On: 05 OCT 2025 3:11PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 ऑक्‍टोबर 2025

 

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज दार्जिलिंगमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच, त्यांनी जखमींची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी प्रार्थना केली आहे.

सामाजिक संपर्क माध्यम ‘एक्स’वरील आपल्या एका संदेशामध्ये उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन म्हणाले- “दार्जिलिंगमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनानंतरच्या पुल दुर्घटनेत झालेल्या दुर्दैवी जीवितहानीमुळे अतिशय व्यथित झालो आहे. शोकाकुल कुटुंबियांप्रती  मनःपूर्वक संवेदना. जखमींची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी प्रार्थना.”

 

* * *

निलिमा चितळे/नितिन गायकवाड/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2174990) Visitor Counter : 9