पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

तिरुप्पुर कुमारन आणि सुब्रमण्य शिव यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली

प्रविष्टि तिथि: 04 OCT 2025 4:51PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील दोन थोर व्यक्तिमत्त्वांना - तिरुप्पुर कुमारन आणि सुब्रमण्य शिव यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली वाहिली.

X या समाज माध्यमावरील वेगवेगळ्या संदेशात पंतप्रधान म्हणाले :

“या दिवशी, आपण भारतमातेचे दोन महान सुपुत्र, तिरुप्पुर कुमारन आणि सुब्रमण्य शिव यांचे स्मरण करतो आणि त्यांना वंदन करतो. दोघेही तामिळनाडू या महान राज्यातील रहिवासी होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि राष्ट्रवादाची भावना जागृत करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले.

तिरुप्पुर कुमारन यांनी आपला राष्ट्रध्वज हातात धरून आपल्या प्राणाची आहुती दिली आणि अशा प्रकारे अढळ धैर्य आणि निःस्वार्थ बलिदान काय असते हे दाखवून दिले. सुब्रमण्य शिव यांनी त्यांच्या निर्भय लेखन आणि ज्वलंत भाषणांद्वारे असंख्य तरुणांमध्ये सांस्कृतिक अभिमान आणि देशभक्ती निर्माण केली.

या दोन महान व्यक्तींचे प्रयत्न आपल्या स्मृतीत कायमचे कोरले गेले असून  आपल्याला वसाहतवादी राजवटीपासून मुक्ती मिळवून देणाऱ्या असंख्य लोकांच्या संघर्षांची आणि कष्टाची आठवण करून देतात. त्यांचे योगदान आपणा सर्वांना राष्ट्रीय विकास आणि एकतेसाठी काम करण्यास प्रेरणा देत राहो.”

***

निलिमा चितळे / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2174854) आगंतुक पटल : 24
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam