वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वस्त्रोद्योगासाठीची उत्पादन संलग्न प्रोत्साहन  योजना: सरकारने नवे अर्ज सादर करण्याची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली

Posted On: 03 OCT 2025 12:12PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली 03 ऑक्टोबर 2025

वस्त्रोद्योगातील भागधारकांकडून मिळणारा अभूतपूर्व आणि उत्साही प्रतिसाद लक्षात घेत केंद्र सरकारने वस्त्रोद्योगासाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन  (पीएलआय) योजनेंतर्गत अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आता हे अर्जसंबंधित पोर्टल 31 डिसेंबर 2025 पर्यत खुले राहील.

उद्योगांच्या वाढत्या रुचीमुळे उत्साहित झालेल्या सरकारने आता संभाव्य गुंतवणूकदारांना योजनेत सहभागी होऊन लाभ मिळवण्याची आणखी एक संधी देऊ केली आहे. मुदतवाढीच्या निर्णयामुळे ऑगस्ट 2025 मध्ये सुरु झालेल्या अलीकडच्या अर्ज फेरीत मानव-निर्मित धागे (एमएमएफ) वापरून निर्माण केलेली वस्त्रे, एमएमएफ कापड तसेच तांत्रिक वापराच्या वस्त्रांसहित अनेक क्षेत्रांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज सादर झाले

इच्छुक अर्जदारांना https://pli.texmin.gov.in/  या अधिकृत ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून त्यांचे प्रस्ताव सादर करता येतील.

अर्जाची सुविधा पुन्हा सुरु होणे पीएलआय योजनेंतर्गत गुंतवणुकीसाठी उद्योग क्षेत्राचा अखंडित इच्छेला थेट प्रतिसाद देणे आहे आणि यातून या योजनेची बाजारपेठेतील मागणी तसेच देशांतर्गत कापड उत्पादनावरील विश्वास दिसून येतो.

***

जयदेवी पुजारी स्वामी / संजना चिटणीस / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2174427) Visitor Counter : 36