पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवसारी, गुजरात येथे पंतप्रधानांनी लखपती दीदींशी केलेल्या संवादाचे इंग्रजी भाषांतर

प्रविष्टि तिथि: 08 MAR 2025 10:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 मार्च 2025

 

लखपती दीदी - आज महिला दिनी आम्हांला मिळालेल्या आदर आणि सन्मान आम्हांली खूप आनंद आहे.

पंतप्रधान - आज जग जरी महिला दिन साजरा करत असेल, परंतु आपल्या मूल्यांमध्ये आणि आपल्या देशाच्या संस्कृतीमध्ये, त्याची सुरुवात ‘मातृ देवो भव’ ने होते. आपल्यासाठी, फक्त एक दिवस नाही, तर सर्व 365 दिवस मातृदेवो भव आहेत. 

लखपती दीदी - शिवानी महिला मंडळात, आम्ही मणीकाम करतो, जे आपल्या सौराष्ट्र संस्कृतीचा एक भाग आहे. सर, आम्ही 400 हून अधिक बहिणींना मणीकामाचे प्रशिक्षण दिले आहे. आमच्या 11 बहिणींपैकी तीन ते चार बहिणी मार्केटिंग हाताळतात, तर दोन सर्व खात्यांचे व्यवस्थापन पाहतात. 

पंतप्रधान - याचा अर्थ, मार्केटिंग हाताळणाऱ्या बाहेर प्रवास करतात?

लखपती दीदी - हो, सर, वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि इतरही.

पंतप्रधान - तर, तुम्ही देशभर प्रवास केला आहे का?

लखपती दीदी - हो,सर, जवळजवळ सगळीकडे. असे कोणतेही शहर उरले नाही जिथे आम्ही प्रवास केला नाही.

पंतप्रधान - आणि पारुल ताई किती कमावते?

लखपती दीदी - पारुल ताई 40000 पेक्षा जास्त कमावते, सर. .

पंतप्रधान - तर, तुम्ही आता लखपती दीदी झाला आहात?

लखपती दीदी - हो, सर, मी लखपती दीदी झाली आहे आणि माझ्या उत्पन्नाची गुंतवणूक ही मी केली आहे. माझे स्वप्न आहे की माझ्यासोबत, आमच्या गटातील 11 बहिणी देखील लखपती दीदी बनल्या आहेत आणि मला वाटते की आमच्या गावातील प्रत्येक बहिणीने ते साध्य करावे.

पंतप्रधान - व्वा!

लखपती दीदी - सर्व बहिणींना लखपती दीदी बनवण्याचे माझे ध्येय आहे.

पंतप्रधान - बरं मग,माझे स्वप्न आहे, 3 कोटी लखपती दीदी निर्माण करणे. मला वाटते की, तुम्ही सर्वजण ते 5 कोटींवर नेऊ शकाल!

लखपती दीदी - नक्कीच, सर! हे वचन आहे!

लखपती दीदी - माझ्या टीममध्ये 65 बहिणी आहेत - माझ्यासोबत 65 महिला काम करतात. आम्ही 'मिश्री' (खडी साखर) पासून बनवलेले एक खास सरबत तयार करतो. आमची वार्षिक उलाढाल 25 ते 30 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. माझी वैयक्तिक कमाई सुमारे 2.5 ते 3 लाख रुपयांची आहे. माझ्या इतर बहिणी देखील प्रत्येकी 2 ते 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त कमावतात. आम्ही आमची उत्पादने विकण्यासाठी बचत गटांसोबत (SHGs) देखील सहकार्य करतो. सर, हे व्यासपीठ मिळणे म्हणजे आम्हाला आधारस्तंभ सापडल्यासारखे आहे. आम्ही आज जिथे आहोत तिथे पोहोचण्याची कल्पनाही केली नव्हती. माझ्यासोबत काम करणाऱ्या महिलांनी त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण दिले आहे, सर, आणि आम्ही त्यांना नवीन संधी शोधण्यास मदत केली आहे. माझ्या गटामधील अनेक महिला आता त्यांच्या अ‍ॅक्टिव्हा स्कूटरवर मार्केटिंगसाठी जातात, काही बँकांची काम करतात आणि काही विक्रीत गुंतलेल्या आहेत.

पंतप्रधान - तर, तुम्हा सर्व बहिणींकडे आता स्वतःची वाहने आहेत?

लखपती दीदी - हो, सर! आणि मी स्वतः एक इको कार देखील खरेदी केली आहे!

पंतप्रधान - खूप छान!

लखपती दीदी - मला स्वतः गाडी चालवता येत नाही सर, म्हणून जेव्हा मला प्रवास करायचा असतो, तेव्हा मी ड्रायव्हरला सोबत घेते. सर, आज आमचा आनंद द्विगुणित झाला आहे! आमच्यासाठी ते नेहमीच एक स्वप्न होते - आम्ही तुम्हाला टीव्हीवर पाहायचो आणि खूप गर्दीतही आम्ही तुमची एक झलक पाहण्याचा प्रयत्न करायचो. आणि आता, आम्ही तुम्हाला जवळून पाहत आहोत!

पंतप्रधान - बघा, मी तुमच्या प्रत्येक स्टॉलला भेट दिली आहे. जेव्हा जेव्हा मला संधी मिळते - मी मुख्यमंत्री असो किंवा पंतप्रधान -  मला काही फरक पडत नाही. मी तसाच आहे. 

लखपती दीदी - सर, तुमच्यामुळे, तुमच्या आशीर्वादामुळेच आम्ही महिला इतक्या अडचणींवर मात करू शकलो आहोत आणि इतक्या उच्च पदावर पोहोचू शकलो आहोत. तुमच्यामुळे आम्ही लखपती दीदी बनलो आहोत. आणि आज, माझ्या सोबतच्या महिला देखील...

पंतप्रधान - तुमच्या गावातील लोकांना माहित आहे का की तुम्ही लखपती दीदी आहात?

लखपती दीदी - हो, सर! सर्वांना माहित आहे! मी इथे येण्यासाठी निघाले तेव्हां काही लोकांना काळजी वाटत होती की आम्ही आमच्या गावाबद्दल तुमच्याकडे तक्रार करणार आहोत आणि ते म्हणाले, "दीदी, जर तुम्ही गेलात तर कृपया कोणतीही तक्रार करू नका."

लखपती दीदी - २०२३ मध्ये, जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष जाहीर केले, तेव्हा, आमच्या गावातील महिलांना लक्षात आले की बाजरी (मोती बाजरी) आणि ज्वारी ३५ रुपये प्रति किलोने विकण्याऐवजी, आपण मूल्यवर्धनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. अशा प्रकारे, लोक पोषक खाऊ शकतील आणि आमचा व्यवसाय देखील वाढू शकेल. म्हणून, आम्ही तीन उत्पादनांनी सुरुवात केली: त्यापैकी एक कुकीज आणि दुसरा खाखरा, तुम्हाला गुजराती खाखरा माहित आहे. 

पंतप्रधान - खाखरा आता अखिल भारतीय उत्पादन आहे!

लखपती दीदी - हो, साहेब! तो संपूर्ण भारतात पोहोचला आहे.

पंतप्रधान - जेव्हा लोक ऐकतात की मोदी जी लखपती दीदी तयार करू इच्छितात, तेव्हा त्यांना काय वाटते?

लखपती दीदी - सर, खरं सांगायचं तर,सुरुवातीला त्यांना वाटले की हे महिलांसाठी शक्य नाही. लखपती - म्हणजे कमाईत अनेक शून्य असणे - ही गोष्ट फक्त पुरुषांच्या खिशात असायला हवी असा विचार लोक करतात. पण मी त्यांना सांगते, "आज, आपण लखपती आहोत; काही वर्षांत, याच दिवशी, आपण करोडपती दीदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू!"

पंतप्रधान - व्वा!

लखपती दीदी - आणि आपण हे स्वप्न साकार करू! तुम्ही आम्हाला मार्ग दाखवला आहे आणि आम्हाला लखपती बनण्यास मदत केली आहे. आता, आम्ही पुढचे पाऊल उचलू आणि तुम्हाला दाखवू की आम्ही करोडपती झालो आहोत. सर त्यासाठी, एक बॅनर असेल - आम्ही आता करोडपती दीदी आहोत!

लखपती दीदी - मी देखील एक ड्रोन पायलट आहे, ड्रोन दीदी आहे आणि सध्या, माझी कमाई २ लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

पंतप्रधान- मी एकदा एका बहिणीला भेटलो ज्यांनी मला सांगितले, "मला सायकल कशी चालवायची हे देखील माहिती नव्हते, आणि आता मी ड्रोन उडवायला शिकले आहे!"

लखपती दीदी - आम्हाला कदाचित विमाने उडवता येणार नाहीत,पण किमान ड्रोन उडवून आम्ही पायलट झालो आहोत."

पंतप्रधान - तर, तुम्ही पायलट झाला आहात तर!

लखपती दीदी - हो, सर! माझे दीर आता मला 'वहिनी’ म्हणत नाहीत - ते मला पायलट म्हणतात!

पंतप्रधान - अरे!  तुम्ही तर आता संपूर्ण कुटुंबासाठी पायलट दीदी झाला आहात?

लखपती दीदी - हो, साहेब! जेव्हा जेव्हा ते घरी येते तेव्हा ते माझे पायलट म्हणून स्वागत करतात!

पंतप्रधान - आणि गावकरी काय म्हणतात? ते तुम्हालाही असे संबोधतात का?

लखपती दीदी - हो, गावकरीही मला हेच म्हणतात!

पंतप्रधान - तुम्हाला तुमचे प्रशिक्षण कुठून मिळाले?

लखपती दीदी - महाराष्ट्रात पुण्यामध्ये 

पंतप्रधान - तर, तुम्ही प्रशिक्षणासाठी पुण्याला गेला होता का?

लखपती दीदी - हो, सर, पुण्याला गेले!

पंतप्रधान -  तुमच्या कुटुंबाने तुम्हाला जाऊ दिले का?

लखपती दीदी - हो, त्यांनी जाऊ दिले.

पंतप्रधान - अरे, खूपच छान.

लखपती दीदी - माझे मूल त्यावेळी खूप लहान होते. मला त्याला घरी ठेवावे लागले, आणि मी सतत विचार करत होते की तो माझ्याशिवाय राहिल का.

पंतप्रधान - तर, एक प्रकारे, तुमच्या मुलाने तुम्हाला ड्रोन दीदी बनवले!

लखपती दीदी - हो! आणि आता त्याचेही एक स्वप्न आहे - तो मला सांगतो, "आई, तू ड्रोन पायलट झाली आहेस आणि मी विमानाचा पायलट होईन!"

पंतप्रधान - व्वा! आता, ड्रोन दीदींनी देशभरातल्या गावांमध्ये स्वतःचे नाव कमावले आहे!

लखपती दीदी - सर, मी तुमचे आभार मानू इच्छितो कारण, तुमच्या ड्रोन दीदी योजनेअंतर्गत, मी आता लखपती दीदी बनले आहे!

पंतप्रधान - घरात तुमचे स्थान देखील ऊंचावले असेल.!

लखपती दीदी - हो, सर!

लखपती दीदी - मी सुरुवात केली तेव्हा माझ्यासोबत फक्त 12 बहिणी होत्या. आता ही संख्या 75 झाली आहे!

पंतप्रधान - त्या किती कमावतात?

लखपती दीदी - आमच्या राधा कृष्ण मंडळाबद्दल बोलायचे झाले तर, तिथल्या बहिणी भरतकाम आणि पशुपालन या दोन्ही कामांमध्ये गुंतलेल्या आहेत. एकत्रितपणे, त्या दरवर्षी सुमारे 9.5-10 लाख रुपये कमवतात.

पंतप्रधान - दहा लाख रुपये!

लखपती दीदी - हो, सर, आम्ही एवढे पैसे कमावतो.

लखपती दीदी - सर, 2019 मध्ये बचत गटात सामील झाल्यानंतर, मी बडोदा स्वयंरोजगार संस्थेकडून बँक सखी प्रशिक्षण घेतले.

पंतप्रधान - तुम्ही एका दिवसात किती पैसे हाताळता?

लखपती दीदी - सर, मी सरासरी दररोज 1 ते 1.5 लाख रुपये हाताळते, बहुतेक वेळी बँकेतून, परंतु मी काही व्यवहार घरूनही करते.

पंतप्रधान - याचा तुम्हाला ताण येत नाही का?

लखपती दीदी - अजिबात नाही, सर! मी जिथे जाते तिथे फक्त एक छोटी बँक सोबत घेऊन जाते.

पंतप्रधान -  हे छान आहे!

लखपती दीदी - हो, सर.

पंतप्रधान - तर, तुम्ही एका महिन्यात किती बँकिंग व्यवहार करता?

लखपती दीदी - साहेब, माझे मासिक बँकिंग व्यवहार सुमारे 4 ते 5 लाख रुपयांपर्यंत पोहोचतात.

पंतप्रधान - याचा अर्थ लोक आता बँकेवर अधिक विश्वास ठेवत आहेत आणि ते मानतात की तुम्ही आला आहात कर बँक आली आहे.

लखपती दीदी - हो, सर, नक्कीच!

लखपती दीदी - सर मी तुम्हाला मनापासून माझे गुरु मानले आहे. आज, जर मी लखपती दीदी झाली आहे, तर ते तुमच्या प्रेरणेमुळे आहे. तुमच्या मार्गदर्शनामुळे मला पुढे जाण्यास आणि या टप्प्यावर पोहोचण्यास मदत मिळाली आहे. मला असे वाटते की मी स्वप्न जगात आहे. आणि आम्ही लखपती दीदी बनलो आहोत! आता आमचे स्वप्न इतर महिलांना ते साध्य करण्यास मदत करणे आहे. सखी मंडळाने माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणला आहे. एके दिवशी, मसूरीच्या राधा बेन रस्तोगी नावाच्या एका मॅडमने माझे कौशल्य पाहिले आणि मला तिथे बोलावले. मी लगेच होकार दिला आणि मसूरीला गेले. तिथे मी सुमारे 50 स्वयंपाकींना गुजराती रोटला - बाजरी (मोती बाजरी) आणि ज्वारी पासून बनवलेल्या ब्रेड बनवण्याचे प्रशिक्षण दिले.  पण माझ्या प्रवासाचा सर्वात हृदयस्पर्शी भाग म्हणजे तिथे असलेले प्रत्येकजण माझी ओळख करताना म्हणायचे "ही नरेंद्र मोदी साहेबांची भूमी गुजरातची रीता बेन आहे." त्यामुळे मला गुजरातची महिला असल्याचा प्रचंड अभिमान वाटला. सर, हा माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान होता!

पंतप्रधान - आता, तुम्ही सर्वांनी ऑनलाइन व्यवसाय मॉडेलच्या जगात प्रवेश केला पाहिजे. मी सरकारला हा उपक्रम वाढवण्यासाठी  करण्यासाठी तुम्हाला पाठिंबा देण्यास सांगेन. आम्ही इतक्या बहिणींना जोडले आहे आणि त्या तळागाळात कमाई करत आहेत. जगाला हे माहित असणे आवश्यक आहे की भारतीय महिला फक्त घरकाम करण्यापुरत्या मर्यादित नाहीत - हा एक गैरसमज आहे. प्रत्यक्षात, त्या भारताच्या आर्थिक ताकदीमागील एक प्रेरक शक्ती आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेला आकार देण्यात ग्रामीण महिलांची मोठी भूमिका आहे. दुसरे म्हणजे, मी पाहिले आहे की आपल्या महिला तंत्रज्ञानाशी लवकर जुळवून घेतात. ड्रोन दिदींसोबतचा माझा अनुभव हे सिद्ध करतो. ड्रोन पायलट होण्यासाठी प्रशिक्षित झालेल्या महिलांनी फक्त तीन ते चार दिवसांत कौशल्ये आत्मसात केली. त्या इतक्या लवकर शिकतात आणि मोठ्या प्रामाणिकपणे सराव करतात. आपल्या देशात, महिलांमध्ये नैसर्गिकरित्या संघर्ष करण्याची, निर्माण करण्याची, संगोपन करण्याची आणि संपत्ती निर्माण करण्याची शक्ती असते. ही शक्ती कोणत्याही गणनेच्या पलीकडे आहे. मला विश्वास आहे की या शक्तीचा देशाला प्रचंड फायदा होईल. 

 

* * *

जयदेवी पुजारी स्‍वामी/नेहा कुलकर्णी/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2173392) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam