युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशभरातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असलेल्या विकसित भारत युवा कनेक्ट उपक्रमाने ओलांडला 50 शैक्षणिक संस्थांचा टप्पा


युथ आयकॉन्सच्या वतीने 75 पैकी 55 पेक्षा जास्त ठिकाणी सत्रांचे आयोजन

Posted On: 28 SEP 2025 2:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 सप्‍टेंबर 2025

 

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने देशभरातील 75 शैक्षणिक संस्थांमध्ये विकसित भारत युवा कनेक्ट कार्यक्रमाअंतर्गत अनेक उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमांअंतर्गत, 17 सप्टेंबर 2025 पासून देशभरातील 55 पेक्षा जास्त विद्यापीठांमध्ये विविध सत्रांचे यशस्वी आयोजन केले गेले आहे. आत्तापर्यंतच्या आयोजनातून लक्ष्यित सत्रांच्या तुलनेत दोन-तृतीयांशचा टप्पा ओलांडला गेला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त देशभरात राबवल्या जात असलेल्या सेवा पंधरवड्याचा भाग म्हणून, 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत विकसित भारत युवा कनेक्ट सेवा पंधरवडा हा उपक्रम राबवला जात आहे. याअंतर्गत देशभरातील  75 ठिकाणच्या 75 विद्यापीठांमध्ये उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. या ठिकाणांची निवड ही पंतप्रधानांच्या जीवनाशी, आणि त्यांच्या कामगिरीशी परस्पर संबंधाच्या आधारे  करण्यात आली आहे. या उपक्रमांमध्ये व्यापक आणि सर्वसमावेशक सहभाग असेल, याची सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने, ग्रामीण, शहरी आणि आदिवासी शैक्षणिक संस्था अशी वेगवेगळी ठिकाणे आणि संस्था निवडल्या गेल्या आहेत.

विकसित भारत युवा कनेक्ट कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये खाली नमूद केली आहेत:

  • 75 युथ आयकॉन, याअंतर्गत विकसित भारत युवा नेतृत्व संवाद 2025 या उपक्रमाअंतर्गतच्या राज्य स्तरीय विजेत्यांची, विकसित भारत युवा संसदमधील विजेत्यांची, राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार विजेत्यांची आणि राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेत्यांची निवड केली गेली आहे. हे सर्व विजेते त्यांच्या संबंधित विद्यापीठांमध्ये सत्रांचे नेतृत्व करणार आहेत. 
  • निवडलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये सादरीकरणांची सत्रे आयोजित केली जात आहेत. या सादरीकरणांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिवर्तनकारी नेतृत्वाखालील गेल्या 11 वर्षांतील भारताच्या विकासाची गाथा आणि मिळवलेल्या यशाबद्दलची माहिती मांडली जात आहे, विकसित भारत @ 2047 च्या संकल्पही अधोरेखित केला जात आहे.
  • संवादात्मक युवा संवाद सत्रांचे आयोजन हे या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य. या सत्रांमधून सहभागी झालेल्यांना त्यांच्या मनातील प्रश्न तसेच त्यांना कराव्याशा वाटत असलेल्या सूचना मांडण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
  • या आयोजनांमध्ये सहभागी होत असलेले श्रोते 15 ते 25 वर्षे वयोगटातील युवा असून, त्यांना धोरणकर्ते, लोकप्रतिनिधी आणि युवा नेत्यांशी संवाद साधण्याची संधी या उपक्रमांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जात आहे.

देशातील युवा वर्गाचे सक्षमीकरण करणे, त्यांना देशाच्या विकासाच्या आराखड्याशी जोडणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या प्रगतीच्या वाटचालीविषयी त्यांना माहिती करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमामुळे युवा वर्गाला 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित भारत घडवण्याच्या संकल्पात स्वतःचे सक्रिय योगदान देण्यासाठी प्रेरणा मिळते आहे.

आत्तापर्यंत गुजरातमधील बिरसा मुंडा आदिवासी विद्यापीठ, पश्चिम बंगालमधील स्वामी विवेकानंद विद्यापीठ, तामिळनाडूतील इंडियन मेरीटाईम विद्यापीठ, मणिपूरातील  धनमंजुरी विद्यापीठ, कारगिल, लडाखमधील शासकीय पदवी महाविद्यालय  तसेच राजस्थान, अजमेरमधील सोफिया गर्ल्स कॉलेज हे महाविद्यालय अशा काही प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये विकसित भारत युवा कनेक्ट या उपक्रमाअंतर्गतची सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.

  

   

 

* * *

नेहा कुलकर्णी/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2172427) Visitor Counter : 5