पंचायती राज मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंचायत राज मंत्रालय संपूर्ण देशात 2 ऑक्टोबर 2025 रोजी सुरु करणार “सबकी योजना, सबका विकास” अभियान ही मोहीम


लोकसहभाग योजना मोहिमे द्वारे 2026-27 या आर्थिक वर्षासाठी पंचायत विकास योजना तयार करण्यास गती मिळणार

Posted On: 27 SEP 2025 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 सप्‍टेंबर 2025

 

पंचायती राज मंत्रालय (मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज-MoPR) संपूर्ण देशात  2 ऑक्टोबर 2025 पासून “लोकसहभाग योजना अभियान 2025-26 अंतर्गत सबकी योजना, सबका विकास” अभियान ही मोहीम राबवणार आहे. या मोहिमेद्वारे 2026-27 या आर्थिक वर्षासाठी पंचायत विकास योजना (PDPs) तयार करण्याची प्रक्रिया सुरू होईल. 2018 मध्ये सुरू झालेल्या लोकसंपन्न योजना अभियानाने पंचायतींना पुराव्यावर आधारित, समन्वित आणि सर्वसमावेशक PDPs तयार करण्यास सक्षम केले आहे. या योजना स्थानिक प्राधान्यांना प्रतिबिंबित करतात आणि राष्ट्रीय उद्दिष्टांशी सुसंगत आहेत. तसेच विशेष ग्रामसभा बैठकांमध्ये या योजनांबाबत मार्गदर्शन मिळते. ही प्रक्रिया ग्रामस्तरीय योजना तयार करण्यासाठी स्थानिक लोकांचा सक्रिय सहभाग वाढवते आणि देशभरातील प्रत्यक्ष कार्यरत पंचायत संस्थांचा कार्यक्षम आणि मजबूत विकास सुनिश्चित करते. eGramSwaraj पोर्टलवरील आकडेवारीनुसार, 2019-20 पासून एकूण 18.13 लाखाहून अधिक पंचायत विकास योजना अपलोड झाल्या आहेत. या योजनांमध्ये ग्राम पंचायत विकास योजना (GPDPs), ब्लॉक पंचायत विकास योजना (BPDPs) आणि जिल्हा पंचायत विकास योजना (DPDPs) यांचा समावेश आहे. 2025-26 साठी सुरु असलेल्या प्रक्रियेत 2.52 लाखाहून अधिक योजना तयार करण्यात आल्या आहेत.

पंचायती राज मंत्रालयाने लोकसहभाग योजना अभियान 2025–26 साठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसह तसेच संबंधित हितधारकांशी ऑनलाइन बैठकांद्वारे संवाद सुरू केला आहे. 26 सप्टेंबर 2025 रोजी अतिरिक्त सचिव  सुशील कुमार लोहनानी यांनी राज्ये/केंद्रशासित प्रदेशे आणि राज्य ग्रामीण विकास व पंचायती राज संस्थांचा सहभाग घेऊन योजना तयारीचे पुनरावलोकन केले आणि योजना अंमलबजावणीचा धोरण आराखडा शेअर केला.सहभाग आणि समन्वय सुनिश्चित करण्यासाठी मंत्रालयाने 20 केंद्रीय मंत्रालये/विभागांना सूचना दिल्या आहेत की त्यांच्या राज्य/UT विभागांना विशेष ग्रामसभा बैठका मध्ये सक्रिय सहभागासाठी मार्गदर्शन करावे. राज्यांना/केंद्रशासित प्रदेशांना, अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी वापरलेली डिजिटल किंवा व्यवस्थापकीय प्रणाली (मॉनिटरिंग प्लॅटफॉर्म) सुरू करणे, प्रमुख समन्वयक आणि जबाबदार अधिकारी (नोडल अधिकारी) नेमणे, मार्गदर्शकांना प्रशिक्षण देणे, ग्रामसभा वेळापत्रक अंतिम करणे, सार्वजनिक माहिती फलक लावणे (सप्टेंबर अखेरपर्यंत), अशी कामे करण्यास सांगितले गेले आहे. याप्रमाणे, 2 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित होणाऱ्या विशेष ग्रामसभांद्वारे हे अभियान औपचारिकरित्या सुरू होईल.

लोकसहभाग योजना अभियान 2025–26: सबकी योजना, सबका विकास ( सर्वांची योजना सर्वांचा विकास)

लोकसहभाग योजना अभियान 2025–26 चा उद्देश सहभागी, पारदर्शक आणि जबाबदार स्थानिक प्रशासन अधिक मजबूत करणे हा आहे. ग्रामसभांमध्ये डिजिटल मंच (eGramSwaraj, Meri Panchayat App, Panchayat NIRNAY) वापरून, या आधीच्या ग्राम पंचायत विकास योजनां (GPDPs) चे पुनरावलोकन, प्रगतीचे मूल्यमापन, विलंब दूर करणे आणि अपूर्ण काम आणि खर्च न झालेल्या केंद्रीय वित्त आयोगाच्या निधींचे प्राधान्य निश्चित करणे यावर भर दिला जाईल. योजना तयार करताना, ग्रामपंचायतींचे कामकाज आणि विकास कितपत चांगला आहे याचे मोजमाप करणारा निर्देशांक (Panchayat Advancement Index-PAI) मार्गदर्शक म्हणून वापरला जाईल, ग्रामसभा बैठकीचे डिजिटल किंवा व्यवस्थित व्यवस्थापन करणारे डिजिटल साधन (SabhaSaar) चा प्रभावी उपयोग केला जाईल, ग्रामपंचायतींचे स्वतःचे उत्पन्न स्रोत (OSR) वाढवले जातील, सामुदायिक सहभाग वाढवला जाईल. आदि कर्मयोगी अभियान अंतर्गत आदिवासी सक्षमीकरणावर विशेष भर दिला जाईल. यामुळे ग्रामसभा सर्वसमावेशक विकासासाठी निर्णायक व्यासपीठ ठरतील, जे राष्ट्रीय उद्दिष्टांशी सुसंगत असेल.ग्रामपंचायत प्रतिनिधी, संबंधित विभाग, समुदाय सदस्य आणि प्राथमिक कर्मचारी सक्रियपणे सहभागी असल्यामुळे हे अभियान योजना प्रक्रियेत पारदर्शकता, समन्वय आणि जबाबदारी अधिक मजबूत करेल, ज्यामुळे ग्रामीण भागातील सेवा वितरण सुधारेल आणि परिणाम चांगले होतील.

 

* * *

शैलेश पाटील/आशुतोष सावे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2172300) Visitor Counter : 17