मंत्रिमंडळ
रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा उत्पादकता संलग्न बोनस देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
प्रविष्टि तिथि:
24 SEP 2025 5:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 सप्टेंबर 2025
रेल्वे कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज 10,91,146 रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 78 दिवसांचा उत्पादकता- संलग्न बोनस (पीएलबी) म्हणून 1865.68 कोटी रुपये देण्यास मंजुरी दिली.
प्रत्येक वर्षी दुर्गापूजा/दसरा सुट्ट्यांपूर्वी पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी पी.एल.बी. चे वितरण केले जाते. यावर्षीही, सुमारे 10.91 लाख अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 78 दिवसांच्या वेतनाइतकी पी.एल.बी. ची रक्कम दिली जात आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना रेल्वेची कामगिरी सुधारण्यासाठी प्रेरित करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून पी.एल.बी. दिला जातो.
प्रत्येक पात्र रेल्वे कर्मचाऱ्यासाठी 78 दिवसांच्या वेतनाइतकी जास्तीत जास्त देय पी.एल.बी. रक्कम 17,951 रुपये आहे. ही रक्कम ट्रॅक मेंटेनर्स, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर (गार्ड), स्टेशन मास्टर्स, सुपरवायझर्स, टेक्निशियन्स, टेक्निशियन हेल्पर्स, पॉइंट्समन, मिनिस्ट्रियल स्टाफ आणि इतर गट 'क' कर्मचाऱ्यांसारख्या विविध श्रेणीतील रेल्वे कर्मचाऱ्यांना दिली जाईल.
2024-25 या वर्षात रेल्वेची कामगिरी खूप चांगली राहिली. रेल्वेने विक्रमी 1640.90 दशलक्ष टन मालाची वाहतूक केली आणि जवळपास 7.3 अब्ज प्रवाशांची ने-आण केली.
* * *
निलिमा चितळे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2170728)
आगंतुक पटल : 83
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali-TR
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam