नागरी उड्डाण मंत्रालय
पावसाळ्याच्या विश्रांतीनंतर चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवांना नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाची अनुमती
Posted On:
18 SEP 2025 8:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 सप्टेंबर 2025
नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) पावसाळ्याच्या विश्रांतीनंतर 15/16 सप्टेंबर 2025 पासून चारधाम यात्रा 2025 साठी हेलिकॉप्टर सेवा पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांच्या नेतृत्वाखाली चारधाम सेवांची सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीने कठोर तपासणीनंतर धोरणात्मक उपक्रम राबविण्यात आले आहेत. सुरक्षेतील कोणत्याही त्रुटींसाठी शून्य सहनशीलतेच्या स्पष्ट आदेशासह, डीजीसीएला कठोर उपाययोजनांचा अवलंब करण्याचे तसेच सुरक्षित सेवा सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
डीजीसीए, एएआय, राज्य सरकार आणि उत्तराखंड नागरी हवाई वाहतूक विकास प्राधिकरण (यूसीएडीए) यांच्यातील निकट समन्वय सुनिश्चित करण्यासाठी मंत्री राममोहन नायडू यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासमवेत डेहराडून आणि दिल्ली येथे अनेक आढावा बैठका घेतल्या.
मंत्र्यांच्या निर्देशांनुसार, डीजीसीएने 13 ते 16 सप्टेंबर 2025 दरम्यान डीजीसीए पथकाद्वारे सर्व हेलिपॅड, हेलिकॉप्टर, ऑपरेटर्सची तयारी आणि सहाय्यक सुविधांची व्यापक तपासणी/परीक्षण देखील केले. त्यानंतर यूसीएडीए आणि हेलिकॉप्टर ऑपरेटर्सना हेलिकॉप्टर उड्डाणे पुन्हा सुरू करण्याची मंजुरी देण्यात आली.
याव्यतिरिक्त, सर्व सहभागी हेलिकॉप्टर ऑपरेटर आणि वैमानिकांना डीजीसीएने यातील आव्हानांबद्दल माहिती दिली, हेलिकॉप्टरच्या तीर्थयात्रा उड्डाणांसाठी संबंधित परिपत्रकात स्वीकारलेल्या अतिरिक्त सुरक्षा उपायांबद्दल माहिती दिली.
उत्तराखंडच्या उंच आणि दुर्गम भागात असलेल्या तीर्थक्षेत्रांमध्ये यात्रेकरूंची सुलभ वाहतूक करण्यामधील हेलिकॉप्टर सेवांची महत्त्वाची भूमिका ओळखून डीजीसीएने सुरक्षित आणि सुरळीत कार्यान्वयन सुनिश्चित करण्यासाठी वाढीव सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत. डीजीसीए चारधाम यात्रा हेलिकॉप्टर उड्डाणांवर बारकाईने आणि सतत लक्ष ठेवेल.
डीजीसीए राबवत असलेल्या प्रमुख सुरक्षा उपक्रमांमध्ये हे समाविष्ट आहे:
वैमानिकाची पात्रता आणि प्रशिक्षण मजबूत करणे
उन्नत हवाई योग्यता देखरेख
कार्यान्वयन सुरक्षा उपाय
- आव्हानात्मक भूभागात सुरक्षित टेक-ऑफ आणि लँडिंग सुनिश्चित करण्यासाठी वजन आणि संतुलन मर्यादांची काटेकोर अंमलबजावणी.
- परिस्थितीजन्य जागरूकतेसाठी आधुनिक नेव्हीगेषण आणि संप्रेषण साधनांचा अनिवार्य वापर.
- एका समर्पित माहिती प्रणालीद्वारे वैमानिकांसाठी रिअल-टाइम अपडेटसह सुधारित हवामान निरीक्षणाची उपलब्धता
- सल्लागार क्षमतेची हवाई वाहतूक सेवा
प्रवासी सुरक्षा आणि जागरूकता
- सर्व प्रवाशांसाठी बोर्डिंगपूर्वी सुरक्षितता माहिती देणे ज्यामध्ये सीट बेल्टचा वापर, सुरक्षितपणे चढणे/उतरणे आणि आपत्कालीन प्रक्रियांचा समावेश आहे.
- प्रवाशांन ये-जा करण्यासाठी मदत करण्याकरिता आणि त्यांचे नियमन करण्यासाठी हेलिपॅडवर अतिरिक्त भूसुरक्षा कर्मचाऱ्यांची तैनाती.
नियामक देखरेखीचे मजबूतीकरण
- जमिनीवरील देखरेखीसाठी डीजीसीएची उड्डाण कार्यान्वयन आणि हवाई योग्यता पथके महत्त्वाच्या हेलिपॅडवर तैनात केली जातील.
- सुरक्षा निर्देशांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी अचानक तपासणी आणि परीक्षण केले जाईल.
चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुन्हा सुरू केल्याने यात्रेकरूंना या पवित्र तीर्थस्थळांपर्यंत सुरक्षित, कार्यक्षम आणि विश्वासार्ह वाहतूक साधन मिळेल अशी अपेक्षा आहे.
निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2168304)