रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

1 ऑक्टोबरपासून, सामान्य आरक्षित तिकीट ऑनलाइन बुक करण्यासाठी पहिल्या 15 मिनिटांत आयआरसीटीसी संकेतस्थळ /अ‍ॅपद्वारे आधार प्रमाणीकरण अनिवार्य: सामान्य वापरकर्त्यांना फायदा देण्यासाठी आणि गैरवापर टाळण्यासाठी उपाययोजना

प्रविष्टि तिथि: 15 SEP 2025 9:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 सप्टेंबर 2025

आरक्षण प्रणालीचा लाभ सर्वप्रथम सामान्य वापरकर्त्यांपर्यंत पोहोचावा आणि गैरवापर करणाऱ्या घटकांकडून त्याचा गैरवापर होऊ नये, यासाठी 1 ऑक्टोबर 2025 पासून, सामान्य आरक्षणाच्या सुरुवातीच्या पहिल्या 15 मिनिटांत, आरक्षित सामान्य तिकीट फक्त आधार-प्रमाणित वापरकर्त्यांद्वारेच इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी ) च्या संकेतस्थळ/अ‍ॅपद्वारे बुक केले जाऊ शकेल.

तथापि, सध्या भारतीय रेल्वेच्या संगणकीकृत पीआरएस  काउंटरद्वारे  सामान्य आरक्षित तिकीट बुक करण्याच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही. तसेच, अधिकृत रेल्वे तिकीट एजंट्सना सुरुवातीच्या दिवशी आरक्षित तिकीट बुक करण्याची परवानगी नसलेल्या 10 मिनिटांच्या प्रतिबंधातही  कोणताही बदल होणार नाही. 

‍निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2166997) आगंतुक पटल : 23
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Bengali , Kannada , Urdu , हिन्दी , Gujarati , Telugu , Malayalam