गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीत ‘ज्ञान भारतम् मिशन’च्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनाबद्दल व्यक्त केला आनंद
प्रविष्टि तिथि:
13 SEP 2025 6:51PM by PIB Mumbai
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीत ‘ज्ञान भारतम् मिशन’ च्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजनाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतून सुरू करण्यात आलेल्या ‘ज्ञान भारतम मिशन’ च्या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन नवी दिल्लीत होणे ही अत्यंत आनंदाची बाब आहे, त्यामुळे हस्तलिखित, भूर्जपत्र, ताम्रपत्र, शिलालेख आणि अभिलेखांमध्ये संकलित भारताच्या ज्ञान, विज्ञान आणि संशोधनाची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचेल, असे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी एक्स या माध्यमावर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे.483 कोटी रुपये खर्चून देशभरातल्या 1 कोटीपेक्षा जास्त हस्तलिखितांचे सर्वेक्षण,विश्लेषण यातून ज्ञान भारतम मिशन संपूर्ण जगाला पुन्हा एकदा भारताच्या ज्ञान वारशाशी जोडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
***
निलिमा चितळे / निखिलेश चित्रे / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2166422)
आगंतुक पटल : 23