भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

देशव्यापी ‘एसआयआर’ तयारीचा आढावा घेण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्यावतीने सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची परिषद

Posted On: 10 SEP 2025 10:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2025 

1. भारतीय निवडणूक आयोगाने यंदाच्या वर्षातील तिसरी मुख्य निवडणूक अधिकारी परिषद नवी दिल्लीतील भारतीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन आंतरराष्ट्रीय संस्था (आयआयआयडीईएम) येथे आयोजित केली.

2. परिषदेचे उद्घाटन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीरसिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्या उपस्थितीत केले. आयोगाने सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयांची देशव्यापी एसआयआर सरावासाठीची तयारी तपासली.

3. बिहारच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी अवलंबलेली धोरणे, अडचणी व सर्वोत्तम पद्धतींवरील सादरीकरण करण्यात आले जेणेकरून इतर राज्यांतील मुख्य निवडणूक अधिकारी त्यांच्या अनुभवांतून शिकू शकतील.

4. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्या राज्य/केंद्रशासित प्रदेशातील मतदारसंख्या, मागील एसआयआर ची पात्रता तारीख आणि मतदार यादी याबाबत सविस्तर सादरीकरण केले. याशिवाय, मागील एसआयआर नंतर मतदार यादीचे डिजिटायझेशन व राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर अपलोडिंगची स्थितीही त्यांनी मांडली.

5. राज्य/केंद्रशासित प्रदेशातील विद्यमान मतदारांची मागील एसआयआर नुसारच्या मतदारांशी जुळवणी (मॅपिंग) करण्याची स्थिती देखील यावेळी सादर करण्यात आली.

6. कोणत्याही मतदान केंद्रावर 1200 पेक्षा जास्त मतदार नसावेत यासाठी आयोगाने घेतलेल्या उपक्रमाच्या समान अंमलबजावणीसाठी मतदान केंद्रांची तर्कसंगतता तपासण्यात आली.

7. कोणताही पात्र नागरिक मतदार यादीतून वगळला जाऊ नये आणि कोणताही अपात्र व्यक्ती त्यात समाविष्ट होऊ नये यासाठी आवश्यक कागदपत्रांची सूचना मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केली. नागरिकांना सोयीस्करपणे कागदपत्रे सादर करता यावीत यावरही भर देण्यात आला.

8. आयोगाने डीईओ, ईआरओ, एईआरओ, बीएलओ आणि बीएलए यांच्या नियुक्ती व प्रशिक्षण स्थितीचाही आढावा घेतला.

 
सुवर्णा बेडेकर/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2165481) Visitor Counter : 2
Read this release in: English , Urdu , Malayalam