निती आयोग
नीती आयोगाने यूएनडीपीच्या सहकार्याने 09 सप्टेंबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे 'राष्ट्रीय बहुआयामी गरीबी निर्देशांक (एमपीआय): पोहोच आणि राष्ट्रीय क्षमता मजबूत करणे' या विषयावर केले राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन
Posted On:
10 SEP 2025 4:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2025
या कार्यशाळेत भारताच्या एमपीआय प्रवासावर आणि एमपीआय मोजण्यामागील तांत्रिक पद्धतीवर प्रकाश टाकण्यात आला.
राज्य समर्थन अभियानांतर्गत नीती-राज्य कार्यशाळेच्या मालिकेचा भाग म्हणून नीती आयोगाने संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या सहकार्याने, 9 सप्टेंबर 2025 रोजी दिल्ली येथे 'राष्ट्रीय बहुआयामी गरीबी निर्देशांक (एमपीआय): पोहोच आणि राष्ट्रीय क्षमता मजबूत करणे' या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.
या परिषदेत 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांसह सरकारच्या विविध मंत्रालयांचे, संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांचे (यूएनडीपी, यूएनआरसीओ) आणि थिंक टँक (इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ, आय आय टी रुडकी, एनसीएईआर, सीईईडब्ल्यू, ‘इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंट’ आणि द नज इन्स्टिट्यूट) प्रतिनिधींनी सहभाग घेतला.
नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन के. बेरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्घाटन सत्रात ईएसी-पीएमचे अध्यक्ष प्रा. एस. महेंद्र देव; नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल; भारतातील संयुक्त राष्ट्रांच्या निवासी समन्वयक शोम्बी शार्प; एमओएसपीआयचे सचिव डॉ. सौरभ गर्ग; ओपीएचआयच्या संचालक डॉ. सबिना अल्किरे; आणि नीति आयोगाचे कार्यक्रम संचालक राजीव कुमार सेन यांची अभ्यासपूर्ण भाषणे झाली. या सत्रात गरीबी कमी करण्यासाठी, मजबूत प्रशासनासाठी तसेच एसडीजींच्या प्रगतीमधील एमपीआयचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
सामाजिक संरक्षण आणि दारिद्र्य निर्मूलन योजनांमधील लक्ष्यीकरणासाठी राज्ये सध्या डेटा कसा वापरत आहेत आणि या प्रयत्नांमध्ये एमपीआय एकत्रित करण्याच्या क्षमतेवर गट चर्चा आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रम आरेखन आणि वितरणात अधिक प्रभावी, डेटा-चालित निर्णय घेण्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने मंचावरील सदस्यांनी महत्त्वपूर्ण अंतर्दृष्टी सामायिक केली, ज्यामध्ये सर्वेक्षणांची वारंवारता कमी करणे आणि विद्यमान डेटाच्या पूरक पद्धती यांचा समावेश आहे. त्यांनी तामिळनाडूची मुख्यमंत्री नाश्ता योजना, उत्तर प्रदेशचे संभव अभियान, आंध्र प्रदेशची शून्य गरीबी – पी-4 आणि ओडिशाचा सामाजिक संरक्षण वितरण मंच यासारख्या विविध उपक्रमांची कल्पना आणि अंमलबजावणी करण्याचे त्यांचे अनुभव देखील सामायिक केले.
या कार्यशाळेत राष्ट्रीय एमपीआयच्या तांत्रिक पद्धती आणि भारतातील बहुआयामी गरीबीचे विश्लेषण करताना कोणीही मागे राहू नये (एलएनओबी) यावर लक्ष केंद्रित करणारे सत्र देखील समाविष्ट होते. कार्यशाळेचा समारोप एका व्यावहारिक सरावाने झाला ज्यामध्ये एक्सेलमध्ये एमपीआय गणना प्रदर्शित करण्यासाठी नमुना डेटासेट वापरण्यात आला आणि सहभागींना संख्यांमागील बारकावे चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत झाली.
सुवर्णा बेडेकर/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2165293)
Visitor Counter : 2