दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
एसएमएस मोहीम नाकारण्याबाबत प्रसारमाध्यमांच्या वृत्तांवरील स्पष्टीकरण
प्रविष्टि तिथि:
08 SEP 2025 4:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2025
ट्राय ने एका राजकीय पक्षाच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना पक्षाच्या मोहिमेसंदर्भात एसएमएस पाठविण्याचा अर्ज नाकारला आहे असा आरोप करणाऱ्या प्रसारमाध्यमांमधील वृत्तांची नोंद भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) घेतली आहे. ट्राय अशा वैयक्तिक एसएमएस मोहिमांच्या स्वीकृती किंवा अस्वीकृतीची कोणतीही भूमिका अमान्य करतो. एसएमएस संदेश नमुन्याची मान्यता किंवा अस्वीकरण दूरसंचार सेवा प्रदात्यांद्वारे (टीएसपी) केले जाते.
वैयक्तिक एसएमएस मोहिमांच्या स्वीकृती किंवा अस्वीकरणात ट्राय चा सहभाग नसतो. ही कामे टीसीसीसीपीआर, 2018 अंतर्गत विहित आराखड्यानुसार टीएसपीद्वारे केली जातात.
वरील बाबी विचारात घेता, माध्यमांमध्ये नोंदवलेल्या विशिष्ट प्रकरणात त्यांची कोणतीही भूमिका नसल्याचा पुनरुच्चार ट्राय ने केला आहे.
सुषमा काणे/वासंती जोशी/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2164654)
आगंतुक पटल : 9