अवजड उद्योग मंत्रालय
नवीन जीएसटी दरांचा अवजड उद्योगांवर परिणाम
Posted On:
08 SEP 2025 3:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 सप्टेंबर 2025
नवीन जीएसटी दर आणि स्लॅब्सचा अवजड उद्योगांशी संबंधित अनेक वस्तूंवर व्यापक परिणाम होईल. त्याचे तपशीलवार स्पष्टीकरण खालीलप्रमाणे :
वाहन उद्योग
• वाहन उद्योग क्षेत्रासाठी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये दर कपात आहे. त्यात मोटारसायकली (350 सीसी पर्यंत ज्यामध्ये 350 सीसीच्या मोटारसायकलींचा समावेश आहे), बस, लहान मोटारी, मध्यम आणि आलिशान मोटारी, ट्रॅक्टर (<1800 सीसी) इत्यादींचा समावेश आहे.
• वाहनांच्या सुट्या भागांवरील दर देखील कमी केले जात आहेत.
• कमी जीएसटीमुळे मागणी वाढेल, ज्यामुळे वाहन उत्पादक आणि मोठ्या सहायक उद्योगांना (टायर, बॅटरी, घटक, काच, पोलाद, प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक्स इ.) मदत होईल.
• वाहनांच्या वाढत्या विक्रीमुळे या घटकांसाठी मागणी वाढेल, ज्यामुळे या पुरवठा साखळीचा मोठा भाग असलेल्या एमएसएमईंवर बहुगुणक परिणाम होईल.
• संपूर्ण वाहन उद्योग प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे उत्पादन, विक्री, वित्तपुरवठा, देखभाल इत्यादी क्षेत्रात 3.5 कोटींहून अधिक नोकऱ्यांना आधार देतो.
• जीएसटी दरात कपात केल्याने जुन्या वाहनांच्या जागी नवीन, इंधन-कार्यक्षम मॉडेल्स वापरण्यास प्रोत्साहन मिळेल, ज्यामुळे स्वच्छ वाहतूक सुविधांना चालना मिळेल.
दुचाकी (350 सीसी पर्यंतच्या मोटारसायकली ज्यामध्ये 350 सीसीच्या मोटारसायकलींचा समावेश आहे) - (28% वरून 18%)
• कमी जीएसटीमुळे मोटारसायकलींच्या किंमती कमी होतील, ज्यामुळे तरुण, व्यावसायिक आणि निम्न-मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी त्या अधिक सुलभ ठरतील.
• ग्रामीण आणि अर्ध-शहरी भारतात मोटारसायकली हे वाहतुकीचे प्राथमिक साधन आहे; स्वस्त मोटारसायकलींचा थेट फायदा शेतकरी, लहान व्यापारी आणि रोजंदारीवर काम करणाऱ्यांना होईल.
• यामुळे कंत्राटी कामगारांना मदत होईल आणि दुचाकी कर्जासाठी कमी खर्च आणि ईएमआय याद्वारे कंत्राटी कामगारांची बचत वाढण्याची अपेक्षा आहे.
लहान मोटारी (जीएसटी 28% वरून 18% पर्यंत कमी)
• परवडणाऱ्या श्रेणीतील मोटारी स्वस्त होतील, ज्यामुळे पहिल्यांदाच खरेदी करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि घरगुती गतिशीलता वाढेल.
• कमी केलेल्या जीएसटीमुळे लहान शहरे आणि गावांमध्ये विक्रीला चालना मिळेल जिथे लहान मोटारींचे वर्चस्व आहे.
मोठ्या मोटारी (जीएसटी कोणत्याही उपकराशिवाय सरसकट 40% पर्यंत कमी झाला आहे)
• अतिरिक्त उपकर काढून टाकल्याने केवळ दर कमी झाले नाहीत तर कर आकारणी सोपी आणि नेमकीदेखील झाली आहे.
• 40% वरही उपकर नसल्यामुळे मोठ्या गाड्यांवरील प्रभावी कर कमी होईल, ज्यामुळे त्या महत्त्वाकांक्षी खरेदीदारांसाठी तुलनेने अधिक परवडणाऱ्या होतील.
ट्रॅक्टर (<1800 सीसी 12% वरून 5% पर्यंत कमी)
सेमी-ट्रेलर्सचे रोड ट्रॅक्टर (1800 सीसी पेक्षा जास्त इंजिन क्षमता 28% वरून 18% पर्यंत कमी)
ट्रॅक्टरचे भाग 5% पर्यंत कमी केले
बस (10+ व्यक्तींची बसण्याची क्षमता) [जीएसटी 28% वरून 18% पर्यंत कमी]
व्यावसायिक मालाची वाहने (ट्रक, डिलिव्हरी-व्हॅन, इ.) [जीएसटी 28% वरून 18% पर्यंत कमी]
सुषमा काणे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2164653)
Visitor Counter : 2