संरक्षण मंत्रालय
आयएनएस कदमत ची पापुआ न्यू गिनीला भेट
Posted On:
07 SEP 2025 6:54PM by PIB Mumbai
पापुआ न्यू गिनीच्या 50व्या स्वातंत्र्यदिन समारंभाचा भाग म्हणून भारतीय नौदलाच्या वाद्यवृंदाने भारतीय नौदलाच्या कदमत या जहाजावर स्वार होत पोर्ट मोरेस्बी इथं भव्य लष्करी संमेलनामध्ये (टॅटू) सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमात अनेक राष्ट्रांचे वाद्यवृंद एकत्रित आले आणि संगीताच्या वैश्विक भाषेच्या माध्यमातून एकता, शिस्त आणि सामाईक वारशाचे प्रतीक ठरले.
भारतीय नौदलाच्या वाद्यवृंदाने मार्शल संगीत धून आणि भारतीय धून सादर करत मान्यवरांची आणि प्रेक्षकांची कौतुकाची दाद मिळवली. या उत्साहवर्धक सादरीकरणातून भारताच्या चैतन्यमयी सांस्कृतिक नीतीमत्तेचे प्रदर्शन झाले आणि प्रशांत राष्ट्रांसमवेतच्या दीर्घकालीन सागरी संबंधांना दुजोरा मिळाला.
या भेटीदरम्यान, आयएनएस कदमतच्या कर्मचाऱ्यांनी बोमना युद्ध स्मशानभूमीला भेट देऊन अनेक अज्ञात भारतीय सैनिकांचा समावेश असलेल्या दुसऱ्या जागतिक महायुद्धातील शहीद वीरांच्या, शौर्य आणि बलिदान यांना श्रद्धांजली वाहिली. यातून महासागर आणि पिढ्यान् पिढ्या राष्ट्रांना बांधून ठेवणाऱ्या सामाईक इतिहास आणि त्याग अधोरेखित झाला.
या वीरांच्या स्मृती सामर्थ्याचा स्रोत आहेत ,ज्यामुळे कर्तव्य, सन्मान आणि धैर्य ही आदर्श मूल्ये कायम ठेवत सामूहिक संकल्प नेहमीच आणि प्रत्येकवेळी बळकट करतात.
(1)JHH9.jpeg)
(2)VIFH.jpeg)
(2)WD3N.jpeg)
***
सुषमा काणे / विजयालक्ष्मी साळवी साने / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2164524)
Visitor Counter : 2