मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील सुधारणांविषयी केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली अनौपचारिक मंत्रीगटाच्या हितधारकांच्या विचारविनिमय बैठकीचे आयोजन
Posted On:
06 SEP 2025 6:15PM by PIB Mumbai
मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या (MoFAHD) अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागासाठी सामाजिक, कल्याण आणि सुरक्षा क्षेत्राच्या अनौपचारिक मंत्री गटांतर्गत भागधारकांच्या विचारविनिमय बैठकीचे आज दूरस्थ पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मत्स्यव्यवसाय क्षेत्रासाठी अनौपचारिक मंत्रीगटाच्या कायदेशीर, धोरणात्मक, संस्थात्मक आणि प्रक्रिया सुधारणा या चार निकषांवर सूचना मागवण्यासाठी ही बैठक बोलाव्यात आली.
केंद्रिय मत्स्य पालन, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय आणि पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंग यांनी दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. मत्स्यपालन विभागाचे सचिव अभिलाक्ष सिंह यांनी, 2047 पर्यंत विकसित भारताच्या निर्मितीच्या दृष्टीकोनातून मत्स्यव्यवसायातील उत्पादन, उत्पादकता आणि निर्यात प्रोत्साहन वृद्धी यामधील आव्हाने आणि सुधारणा ओळखणे या उद्देशाने झालेल्या या विचारविनिमय आणि अभिप्राय सत्राचे नेतृत्व केले.


या बैठकीला संबेधित करताना, राजीव रंजन सिंह यांनी मत्स्यव्यवसाय क्षेत्रामधील उत्पादन, उत्पादकता आणि निर्यात यांमध्ये लक्षणीय वृद्धी कऱण्याच्या दृष्टीने सुधारणा दर्शवणारा पथदर्शी आराखडा तयार करण्यासाठी भागधारकांकडून आलेल्या सूचना आवश्यक असल्याचे अधोरेखित केले. केंद्रिय मंत्र्यांनी भारताच्या मत्स्याहार निर्यात क्षमता बळकट कऱण्यासाठी आणि त्यात विविधता आणण्यासाठी राज्यांतर्गत वापरात न आलेल्या निर्यात क्षमतेचा वापर करण्याची गरज अधोरेखित केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अलीकडे करण्यात आलेल्या नव्या पिढीतल्या वस्तू आणि सेवा कर सुधारणांचेही त्यांनी स्वागत केले आणि हे पाऊल या क्षेत्रामधील स्पर्धात्मकता वृद्धींगत होण्यास चालना मिळेल असेही सांगितले. जागतिक स्तरावर स्पर्धात्मकता टिकवण्यासाठी भागधारकांनी देशांतर्गत मासळी उत्पादन 5 टन प्रति हेक्टर वरून 7 टन प्रति हेक्टर पर्यंत वाढवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे मंत्र्यांनी आवाहन केले. सरकार या क्षेत्राच्या संरचनात्मक परिवर्तनासाठी वचनबद्ध असल्याची खात्री देतानाच कायदेविषयक, धोरणात्मक, संस्थात्मक आणि प्रक्रिया सुधारणा या चार प्रमुख स्तंभांवर आधारित एक
या बैठकीला मत्स्यव्यवसाय विभाग, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मत्स्य पालन, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय विभाग, एनएफडीबी, एमपीईडीए, आयसीएआर संस्था, किनारी प्रदेश मत्स्यशेती प्राधिकरण, फिशरी सर्व्हे ऑफ इंडिया, डीओएफ क्षेत्रीय संस्थआ, मच्छिमार संघटनांचे प्रतिनिधी, उद्योग संस्था (फिक्की, सीआयआय, असोचम, पीएचडी चेंबर) तसेच अनौपचारिक मंत्री गटांतर्गत येणारी विविध केंद्रीय मंत्रालये/विभाग यांच्यासह विविध भागधारक उपस्थित होते.
***
माधुरी पांगे / विजयालक्ष्मी साळवी साने / परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2164414)
Visitor Counter : 2