पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओणम सणाच्या निमित्ताने सर्वांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
05 SEP 2025 10:39AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओणम सणाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण एकता, आशा आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक आहे. या सणाच्या निमित्ताने आपल्या समाजात सलोख्याची भावना वाढू दे आणि निसर्गाशी आपले नाते अधिक दृढ होऊ दे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाज माध्यमावर सामायिक केलेला शुभेच्छा संदेश :
सर्वांना ओणमच्या खूप शुभेच्छा! हा सुंदर सण सर्वांच्या जीवनात नव्याने आनंद, उत्तम आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो. ओणम या सणातून केरळच्या कालातीत परंपरेचे आणि समृद्ध संस्कृतीचे प्रतिबिंब उमटते. हा सण एकता, आशा आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक आहे. या सणाच्या निमित्ताने आपल्या समाजात सलोख्याची भावना वाढू दे आणि निसर्गाशी आपले नाते अधिक दृढ होऊ दे.
* * *
जयदेवी पुजारी स्वामी/तुषार पवार/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2164090)
आगंतुक पटल : 54
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam