कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय 
                
                
                
                
                
                    
                    
                        केंद्रीय नागरी सेवा (राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत एकीकृत निवृत्तिवेतन योजनेची अंमलबजावणी) नियम 2025 ची अधिसूचना
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                04 SEP 2025 1:10PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 4 सप्टेंबर 2025
 
निवृत्तीवेतन आणि निवृत्तिवेतनधारक कल्याण विभागाने केंद्रीय नागरी सेवा (राष्ट्रीय निवृत्तिवेतन  प्रणाली अंतर्गत एकीकृत निवृत्तिवेतन योजनेची अंमलबजावणी) नियम, 2025 ची अधिकृत राजपत्रात अधिसूचना जारी केली आहे.  विभागाने, एनपीएसअंतर्गत यूपीएसला एक पर्याय म्हणून निवडणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसंदर्भात यूपीएस अंतर्गत लाभाशी संबंधित सेवा प्रकरणांचे नियमन करण्यासंदर्भात हे नियम आहेत.  केंद्रीय मंत्रिमंडळाने 24.08.2024 रोजी यूपीएस आणण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. त्यानुसार वित्तीय सेवा विभागाने 24.01.2025 रोजी एनपीएस अंतर्गत एक पर्याय/योजना म्हणून यूपीएसला अधिसूचित केले होते ज्यासाठी एनपीएस अंतर्गत समाविष्ट असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचा पर्याय सादर करावा लागेल. यूपीएस लागू होण्याची तारीख 01.04.2025 असून  पीएफआरडीएने 19.03.2025 रोजी पीएफआरडीए (राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत एकीकृत निवृत्तीवेतन  योजनेचे कार्यान्वयन) नियम,  2025 अधिसूचित केले आहे.
केंद्रीय नागरी सेवा  (राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत एकीकृत निवृत्तिवेतन योजनेची अंमलबजावणी) नियम 2025 मध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
	- एकीकृत निवृत्तिवेतन योजनेअंतर्गत नोंदणी,
- निवृत्तीच्या तारखेच्या एक वर्ष आधी किंवा व्हीआरएसच्या ( स्वेच्छानिवृत्ती) 3 महिने आधी यूपीएसमधून एनपीएसमध्ये जाण्याची सुविधा
- कर्मचारी आणि सरकारकडून योगदान
- नोंदणीत  आणि एनपीएस खात्यात योगदान जमा होण्यात विलंब झाल्यास सरकारी कर्मचाऱ्याला भरपाई
- सेवेदरम्यान सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास सीसीएस अर्थात केंद्रीय नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम किंवा यूपीएस नियमांनुसार लाभांचा पर्याय.
- नियत वयोमानानुसार निवृत्ती, मुदतपूर्व सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्ती, स्वायत्त संस्था किंवा सार्वजनिक क्षेत्र उपक्रमात सामावून घेणे, अवैध ठरल्यास निवृत्ती आणि सेवेतून राजीनामा, यांमुळे मिळणारे निवृत्तीचे देय लाभ.
- सक्तीची निवृत्ती /बडतर्फी /सेवेतून काढून टाकण्याचा परिणाम
- सेवानिवृत्तीच्या वेळी प्रलंबित  विभागीय/न्यायिक कार्यवाहीचा परिणाम.
 
* * *
सुषमा काणे/सोनाली काकडे/दर्शना राणे
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com   /PIBMumbai
/PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai
                
                
                
                
                
                (Release ID: 2163695)
                Visitor Counter : 7