श्रम आणि रोजगार मंत्रालय
कामगार आणि रोजगार मंत्रालयाने बनावट पीएमव्हीबीआरवाय पोर्टलविरुद्ध नागरिकांना केले सावध
Posted On:
03 SEP 2025 3:53PM by PIB Mumbai
कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या निदर्शनास आले आहे की https://viksitbharatrozgaryojana.org/ आणि https://pmviksitbharatrozgaryojana.com/ सारख्या काही वेबसाइट भारत सरकारच्या उपक्रमांबाबत खोटा दावा करत आहेत आणि मंत्रालयाच्या नावाखाली संपूर्ण भारतात विविध ठिकाणी भरतीसाठी अर्ज मागवत आहेत. मंत्रालय या वेबसाइट्स किंवा त्यांच्या कुठल्याही उपक्रमाशी संबंधित नाहीत. अशा पोर्टलद्वारे कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नये, त्यांच्याशी संवाद साधू नये किंवा कोणतेही पेमेंट करू नये असा सल्ला नागरिकांना मंत्रालयातर्फे देण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या 12 व्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात घोषित केलेल्या प्रधानमंत्री विकासित भारत रोजगार योजनेअंतर्गत नोंदणीची सुविधा देणारे प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना पोर्टल, ऑगस्टमध्ये लाईव /सुरु झाले आहे. योजनेअंतर्गत प्रामाणिक आणि अधिकृत माहिती आणि सेवांसाठी, नियोक्ते/ नियुक्तिकर्ता प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना पोर्टल (https://pmvbry.epfindia.gov.in किंवा https://pmvbry.labour.gov.in ) ला भेट देऊ शकतात आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. कामगार आणि रोजगार मंत्रालय सर्व नागरिक, नियोक्ते आणि भागधारकांना फसव्या वेबसाइट्स आणि खोट्या भरती दाव्यांपासून सावध राहण्याचा सल्ला देते.
***
शैलेश पाटील / हेमांगी कुलकर्णी / परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2163498)
Visitor Counter : 2