रसायन आणि खते मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मेडटेक क्षेत्रातील भारताचे सामर्थ्य आणि नवोन्मेषाचे प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने भारत मंडपम येथे  4 ते 6 सप्टेंबर 2025 दरम्यान इंडिया मेडटेक एक्सपो'चे आयोजन

Posted On: 02 SEP 2025 4:20PM by PIB Mumbai

 

औषधनिर्माण विभाग, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय, वैद्यकीय उपकरणे निर्यात प्रोत्साहन परिषद (EPCMD), आणि केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (CDSCO), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या सहकार्याने भारत मेडिकल टेक एक्स्पो 2025 ची दुसरी आवृत्ती नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथील भारत मंडपम येथे 4 ते 6 सप्टेंबर 2025 दरम्यान आयोजित केले जाणार आहे, हा कार्यक्रम म्हणजे  व्यापक भारत आरोग्य  2025 उपक्रमाचा एक भाग आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, रसायने आणि  खत मंत्री  जगत प्रकाश नड्डा, आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान  राज्यमंत्री जितिन प्रसाद यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उदघाटन होणार आहे.

वैद्यकीय तंत्रज्ञान आणि उपकरणे क्षेत्रातील भारताच्या क्षमता आणि वृद्धीला अधोरेखित करणारे एक प्रमुख व्यासपीठ म्हणून इंडिया मेडटेक प्रदर्शन उदयाला आले आहे. प्रदर्शनाच्या 2025 च्या या आवृत्तीमुळे पुन्हा एकदा धोरणकर्ते, जागतिक उद्योगांचे प्रमुख, सर्जक, गुंतवणूकदार आणि आरोग्यक्षेत्रातील भागधारक एकाच व्यासपीठावर एकत्र येतील, ज्यामुळे भारताचे अचूकतेवर आधारित, आणि तरीही  परवडणाऱ्या मेडटेक उपायांसाठी स्थान मजबूत होण्याची संधी उपलब्ध होईल.

भारत: जागतिक मेडटेक उत्पादक केंद्र, अचूक अभियांत्रिकी तरीही किफायतशीर या विषयावर आयोजित केलेल्या या तीन दिवसीय प्रदर्शनात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, स्टार्टअप्स, संशोधन संस्था, भविष्यवादी नवकल्पनांचे दालन, राज्य सरकारांचे सादरीकरण आणि सरकारी उपक्रम यांचे विस्तृत प्रदर्शन पाहायला मिळेल.

या परिषदेत संकल्पनांवर आधारित चर्चासत्र, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गोलमेज परिषद, फायरसाइड चॅट्स आणि राज्य-केंद्रित सत्रे समाविष्ट असतील, यात  केंद्रीय आणि राज्य मंत्री सहभागी होणार आहेत.  याशिवाय एक्स्पीरियंस झोन आणि नेटवर्क निर्माण करण्याच्या संधी जसे की बिझनेस टू बिझनेस बैठकाखरेदीदार -विक्रेता यांच्यात परस्पर बैठका, आणि नियंत्रकांचे ओपन हाऊस यांसारखे उपक्रम देखील असतील ज्यामुळे मेड-टेक मूल्य श्रृंखलेत अधिक सहयोग लाभेल.

या कार्यक्रमाला 30 देशांमधील 150 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय खरेदीदार सहभागी होतील, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय भागधारकांना भारताच्या वेगाने विकसित होणाऱ्या मेडटेक परिसंस्थेत गुंतवणूक आणि भागीदारीच्या अनोख्या संधी उपलब्ध होतील.

या प्रदर्शनात  350 पेक्षा जास्त प्रदर्शक एकत्र येतील आणि विशेष पॅव्हिलियनमध्ये आणि जागतिक मेडटेक क्षेत्रात भारताचे  दूरदर्शी 2047 संकल्प अधिक दृढ करण्यासाठी परिषदांचे सत्र आयोजित केले जाईल. 

***

माधुरी पांगे / भक्ती सोनटक्के / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2163183) Visitor Counter : 8