कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऑगस्ट 2025 मधील कॅप्प्टिव आणि व्यावसायिक खाणीतून मिळालेले मासिक उत्पादन आणि वितरण

Posted On: 02 SEP 2025 11:46AM by PIB Mumbai

 

आर्थिक वर्ष 2025-26 च्या ऑगस्ट 2025 मध्ये  कॅप्प्टिव आणि व्यावसायिक खाणींमधून 14.43 दशलक्ष टन (MT) इतक्या कोळसा उत्पादनाची नोंद झाली  तर या काळात कोळशाचे वितरण 15.07 दशलक्ष टन (MT) पर्यन्त झाले.

2025-26 या आर्थिक वर्षातील आत्तापर्यंतचे एकत्रित आकडे ऑगस्टपर्यंत मजबूत वर्षागणिक वाढ दर्शवितात, कोळशाचे  उत्पादन 11.88 टक्क्यांनी  वाढले आहे आणि वितरणात गेल्या वर्षीच्या याच समान कालावधीच्या तुलनेत 9.12% वाढ झाली आहे. हे सकारात्मक कल  सुधारित कार्यान्वयन  क्षमता  आणि संपूर्ण खाण क्षेत्रातील क्षमतेचा अधिक प्रभावी उपयोग दर्शवतात.

खाली दिलेला आलेख उत्पादन आणि वितरण या दोन्हींच्या कामगिरित  दिसून येणाऱ्या  सातत्यपूर्ण  सुधारनेसोबतच भरिव लाभ स्पष्टपणे दाखवत आहे. 

खाण मंत्रालयाने या क्षेत्राच्या सुधारित कामगिरीचे श्रेय एकत्रित धोरणात्मक उपाययोजना, काटेकोर देखरेख  आणि भागधारकांनी दिलेल्या सातत्यपूर्ण  समर्थनाला दिले आहे. या प्रयत्नांनी कार्यात्मक मंजुरींना वेग देण्यात आणि उत्पादनक्षमतेत वाढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, ज्यामुळे कोळशाच्या उत्पादन आणि वितरणात एकूण वाढ होण्यास मदत झाली आहे.

भारतातील कोळसा खनन प्रक्रियेत बंदिस्त आणि व्यावसायिक खाणींच्या क्षमतेचा पुरेपूर उपयोग करण्यासाठीच्या वचनबद्धतेचा कोळसा मंत्रालयाने पुनरुच्चार केला आहे. पुढे वाटचाल करताना  उत्पादनात सातत्य  राखण्यासाठी, पुरवठा साखळीत येणारे व्यत्यय कमी करण्यासाठी, आणि देशाच्या वाढत्या ऊर्जा आवश्यकतांच्या पूर्ततेसाठी लक्षणीय योगदान देण्यावर भर दिला जाईल.

***

आशिष सांगळे / भक्ती सोनटक्के / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2163018) Visitor Counter : 5