ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाकडून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या खाद्यान्न सचिवांच्या बैठकीचे आयोजन


केंद्राच्या मध्यवर्ती साठ्यासाठी खरीप विपणन हंगामासाठी (KMS) 2025-26 मध्ये (खरीप पिके) अन्नधान्य खरेदी हा मुख्य विषय

Posted On: 01 SEP 2025 7:21PM by PIB Mumbai

 

 

भारत सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने राज्ये / केंद्रशासित प्रदेशांचे खाद्यान्न सचिव आणि भारतीय अन्न महामंडळ (FCI) यांच्यासमवेत बैठक आयोजित केली होती. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे( DFPD) सचिव  संजीव चोप्रा यांनी बैठकीचे अध्यक्षस्थान भुषवले, ज्यामध्ये आगामी खरीप विपणन हंगामातल्या (KMS) 2025-26 मध्ये धान्य खरेदीच्या व्यवस्थेवर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान, 2025-26च्या आगामी खरीप विपणन हंगामामध्ये, तांदळाच्या बाबतीत(खरीप पीक) भाताच्या खरेदीचा अंदाज 463.50 लाख मेट्रीक टन (एलएमटी) आणि आगामी 2025-26 च्या खरीप हंगामामध्ये भरडधान्ये/श्रीधान्ये खरेदीचा अंदाज 19.19 लाख मेट्रीक टन निश्चित करण्यात आला आहे.

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना पिकांच्या विविधतेसाठी आणि आहार बदलांमधील पोषण वाढवण्याच्या दृष्टीने भरडधान्यांच्या खरेदीवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देण्यात आला.

या बैठकीत, विविध विभागांच्या सुरू असलेल्या उपक्रमांची चर्चा झाली, त्यामध्ये प्रामुख्याने मिलिंग कालावधीसाठी वेब आधारित विनंत्यांवर प्रक्रिया करणे, मोबाईल अॅप आधारित भाताची प्रत्यक्ष सहपडताळणी, स्मार्ट पीडीएस, अन्नमित्र, ज्यूट पिशव्यांच्या खरेदीसाठी रोख पत मर्यादेची अंमलबजावणी, डेपो दर्पण, खरेदी केंद्रांतील पायाभूत सुविधा सुधारणा, अन्नधान्य अनुदान देयक प्रक्रियांसाठी स्कॅन (SCAN) पोर्टल, साठवण धोरण आदी विषयांचा समावेश होता.

या बैठकीदरम्यान, भात मिलिंगमध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या योजनेविषयीचे तपशील सामाईक करण्यात आले, त्यामध्ये 10% तुकडा तांदळासह मिलिंग करण्याविषयी चर्चा झाली.

या बैठकीला राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव/सचिव (अन्न), भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तसेच भारतीय अन्न महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

***

शैलेश पाटील / विजयालक्ष्मी साळवी साने / परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2162928) Visitor Counter : 2
Read this release in: Odia , English , Urdu , Hindi , Kannada