दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंदिया यांनी “इनोव्हेट टू ट्रान्सफॉर्म” थीमसह इंडिया मोबाईल काँग्रेस 2025 च्या एआय-आधारित ऍपचे अनावरण केले.


Posted On: 01 SEP 2025 2:49PM by PIB Mumbai

 

ज्योतिरादित्य सिंदिया म्हणाले, की इंडिया मोबाईल काँग्रेस हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर हे शक्यतांचे व्यासपीठ आहे. आयएमसी 2025 साठी प्रतिनिधी, माध्यमे व्यावसायिक, शिक्षणतज्ञ, विद्यार्थी आणि इतर सहभागींसाठी नोंदणी सुरू आयएमसी 2025 चा सहभाग वाढवण्यासाठी आणि सहभागींना सुगम, बुद्धिमान अनुभव प्रदान करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, केंद्रीय दळणवळण आणि ईशान्य क्षेत्र विकास मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंदिया यांनी आज इनोव्हेट टू ट्रान्सफॉर्म”  या संकल्पनेसह इंडिया मोबाईल काँग्रेस (आयएमसी) 2025 साठी एआय-आधारित परस्परसंवादी मोबाईल ऍपचे अनावरण केले. आयएमसीची 9 वी आवृत्ती 8 ते 11 ऑक्टोबर 2025 दरम्यान द्वारका, नवी दिल्ली इथल्या यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर इथे आयोजित करण्यात आली आहे . याप्रसंगी बोलतानाइंडिया मोबाईल काँग्रेस हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर शक्यतांचे व्यासपीठ आहे असे ज्योतिरादित्य सिंदिया यावेळी म्हणाले.

हे ऍप त्या शक्यतांना संपर्क, सहकार्य आणि परिणामांमध्ये रूपांतरित करण्यासाठी तयार केले आहे असेही त्यांनी सांगतिले. पुढे त्यांनी नमूद केले की, आयएमसी 2025 ऍप तंत्रज्ञान आणि सुलभता यांचा मेळ घालण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांपासून ते व्यावसायिकांपर्यंत प्रत्येक सहभागी डिजिटल नवोन्मेषाचा अनुभव तात्काळ आणि सहज घेऊ शकेल.

आयएमसी ऍप:

आयएमसी 2025 ऍप सहभागींचा अनुभव सुलभ आणि समृद्ध करण्यासाठी अनेक आधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश करते. हे ऍप वापरकर्त्यांना सत्रांचे थेट प्रक्षेपण करण्याची सुविधा देते, त्यामुळे जगभरातून सहभागी होणे शक्य होईल. यंदाच्या ऍपमधील एक खास नवोन्मेष म्हणजे आयएमसी सजेस्ट्स’, हा एक एआय-आधारित सहाय्यक असून, तो वापरकर्त्यांच्या आवडींनुसार सत्रे, नेटवर्किंग संधी आणि एफ अँड बी झोन्स सुचवतो, त्यामुळे सहभाग आणि सुलभता वाढते. बैठका आणि वेळापत्रक वैयक्तिक कॅलेंडरशी जोडले आहेत, ज्यामुळे सहभागी संपूर्ण कार्यक्रमादरम्यान आपल्या वेळेचे नीट आयोजन करु शकतील. हे ऍप नेटवर्किंगच्या संधी वाढवते, या ॲपद्वारे  सहभागी, प्रदर्शक, स्टार्टअप्स आणि भागीदारांमध्ये थेट संपर्क, चॅट आणि बैठकांचे नियोजन शक्य होईल. स्टार्टअप्सना या नवीन ऍपद्वारे गुंतवणूकदार आणि मार्गदर्शकांशी संपर्क साधण्याच्या विशेष संधी मिळतील, त्यामुळे या मंचावर सहकार्य आणि नवोन्मेषाला चालना मिळेल. नवीन स्निपेट टूलच्या माध्यमातून, आयएमसी 2025 कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून लोकप्रिय सत्रांमधून सोशल मिडियावर शेअर करण्यायोग्य लहान व्हिडिओ हायलाइट्स तयार करेल, त्यामुळे कार्यक्रमाचा प्रभाव आणि सोशल मीडियावरील प्रसार वाढेल. आयएमसी 2025 ची नोंदणी आता सर्व सहभागींसाठी खुली आहे, यामध्ये प्रतिनिधी, स्टार्टअप्स, विद्यार्थी, मीडिया आणि शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे. इच्छुक सहभागी अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करू शकतील: https://www.indiamobilecongress.com

ऍप लिंक:

iOS - https://apps.apple.com/in/app/india-mobile-congress-2025/id6463416087

Android - https://play.google.com/store/apps/details?id=com.dreamcast.imc2023&pcampaignid=web_share&pli=1

***

शैलेश पाटील / निखिलेश चित्रे / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2162761) Visitor Counter : 2