गृह मंत्रालय
भारत-बांगलादेश सीमेवर कुंपण
Posted On:
20 AUG 2025 6:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2025
पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेची एकूण लांबी 2216.7 किमी आहे, त्यापैकी 1647.696 किमी भागात कुंपण घालण्यात आले आहे. उर्वरित 569.004 किमी पैकी, ज्यावर अजून कुंपण आणि इतर सीमा पायाभूत सुविधांची कामे व्हायची आहेत, त्यापैकी 112.780 किमीचा भाग अव्यवहार्य आहे आणि 456.224 किमीचा भाग व्यवहार्य आहे.
पश्चिम बंगालमधील 456.224 किमी व्यवहार्य आंतरराष्ट्रीय सीमेपैकी 77.935 किमी जमीन हे काम करणाऱ्या एजन्सीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. उर्वरित 378.289 किमीसाठी,राज्य सरकारकडून 148.971 किमी जमिनीचे भूसंपादन अद्याप सुरू व्हायचे आहे. तर उर्वरित 229.318 किमीसाठी भूसंपादन विविध टप्प्यांवर आहे, ज्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:-
|
Stage
|
Length (in km)
|
|
Pending for State Cabinet approval
|
31.019
|
|
Payment made but yet to be handed over by the State
|
181.635
|
|
Valuation yet to be done by the State
|
7.085
|
|
Payment yet to be made by MHA
|
9.579
|
|
Total
|
229.318
|
भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी भारत सरकारकडून खालील पावले उचलली जात आहेत:
i. राज्य सरकारसोबत या विषयावर नियमित बैठका आणि आढावा घेतला जात आहे.
ii. काही आव्हाने असल्यास त्यांचे निराकरण करण्यासाठी राज्यात जाऊन आढावा घेणे आणि समन्वय साधणे.
iii. नियमांनुसार भूसंपादन शुल्क भरणा वेळेवर केला जात आहे.181.635 किमीसाठी आधीच भरणा करण्यात आला आहे.
पश्चिम बंगाल राज्यात गेल्या तीन वर्षांतील (1 जानेवारी, 2023 ते 31 जुलै, 2025) बेकायदेशीर घुसखोरी आणि सीमापार गुन्ह्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
|
Year
|
2023
|
2024
|
2025
(till 31st July, 2025)
|
|
Incoming Apprehensions
(In Nos)
|
1547
|
1694
|
723
|
|
Seizure of Narcotics Item
(In KGs)
|
4988.282
|
3145.606
|
5729.340
|
|
Seizure of Cattle (In Nos)
|
8614
|
8648
|
2886
|
|
Seizure of Phensedyl (In
Nos)
|
210407
|
303480
|
210606
|
|
Seizure of Yaba Tablets (In
Nos)
|
51882
|
86747
|
36440
|
|
Seizure of Gold (In KGs)
|
166.810
|
188.142
|
20.876
|
|
Seizure of FICN (In Rs.)
|
1586000
|
3245700
|
745000
|
गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2158550)
Visitor Counter : 7