श्रम आणि रोजगार मंत्रालय
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने जून 2025 मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक सुमारे 22 लाख निव्वळ सदस्यांची केली नोंदणी
वेतनपट वाढीतील वृद्धी रोजगाराच्या संधींमध्ये वाढ आणि कर्मचारी लाभांबाबत जागरूकता वाढल्याचे दर्शवते
Posted On:
20 AUG 2025 5:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2025
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) जून 2025 साठीची तात्पुरती वेतनपट आकडेवारी जारी केली आहे, ज्यामध्ये 21.89 लाख निव्वळ सदस्यांची भर पडल्याचे दिसून आले आहे, एप्रिल 2018 मध्ये वेतनपट आकडेवारी ट्रॅकिंग सुरू झाल्यापासूनची ही सर्वाधिक नोंद आहे. मे 2025 च्या तुलनेत चालू महिन्यात निव्वळ वेतनपट वाढीमध्ये 9.14 % वाढ झाल्याचे ही आकडेवारी दर्शवते.
जून 2024 च्या तुलनेत जून निव्वळ सदस्यांच्या वाढीमध्ये 13.46% ची वाढ झाल्याचे वार्षिक विश्लेषणातून दिसून येते. सदस्य संख्येच्या या वाढीचे श्रेय अनेक घटकांना दिले जाऊ शकते, ज्यात रोजगाराच्या वाढलेल्या संधी, कर्मचाऱ्यांच्या फायद्यांविषयी वाढती जागरूकता आणि ईपीएफओ’च्या उपक्रमांच्या व्याप्तीचा वाढता प्रभाव यांचा समावेश आहे.
शिवाय, वार्षिक विश्लेषणातून जून 2024 च्या तुलनेत जून 2025 मध्ये निव्वळ वेतनपटवाढीत 13.46% वाढ दिसून येते, जी ईपीएफओच्या प्रभावी संपर्क उपक्रमांमुळे वाढलेल्या रोजगार संधी आणि कर्मचाऱ्यांच्या फायद्यांबद्दल जागरूकता दर्शवते.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या वेतन आकडेवारीतील (जून 2025) प्रमुख ठळक मुद्दे खालीलप्रमाणे आहेत:
नवीन सदस्य नोंदणी:
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने जून 2025 मध्ये सुमारे 10.62 लाख नवीन सदस्य नोंदवले, जे मे 2025 च्या तुलनेत 12.68 % वाढ दर्शवते आणि जून 2024 च्या तुलनेत 3.61% वाढ दर्शवते. नवीन सदस्यांच्या वाढीचे श्रेय वाढत्या रोजगार संधी, कर्मचाऱ्यांच्या लाभाबद्दल वाढलेली जागरूकता आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या यशस्वी जनजागृती कार्यक्रमांना जाते.
वेतनपट वृद्धीमध्ये 18 ते 25 वयोगटाचा मोठा वाटा:
या आकडेवारीचा एक लक्षणीय पैलू म्हणजे 18 ते 25 वयोगटातील सदस्यांची संख्या आघाडीवर आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 18 ते 25 वयोगटातील 6.39 लाख नवीन सदस्य नोंदवले आहेत, जे जून 2025 मध्ये नोंदवलेल्या एकूण नवीन सदस्यांच्या 60.22 % आहे.
या शिवाय, जून 2025 साठी 18 ते 25 वयोगटातील निव्वळ वेतनपटवाढ अंदाजे 9.72 लाख आहे. या वयोगटातील बहुतेक व्यक्ती, विशेष करून तरुण आणि प्रामुख्याने प्रथमच नोकरी करणारे असून ते आधीच्या कलाशी सुसंगत असल्याचे दिसून येते.
पुन्हा सामील झालेले सदस्य:
जून 2025 मध्ये आधी बाहेर पडलेले सुमारे 16.93 लाख सदस्य कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत पुन्हा सामील झाले.
महिला सदस्यत्वात वाढ :
जून 2025 मध्ये सुमारे 3.02 लाख नवीन महिला सदस्य कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत सामील झाल्या. मे 2025 च्या तुलनेत ही आकडेवारी 14.92 % ची वाढ दर्शवते.
महिला सदस्यांच्या संख्येत झालेली वाढ अधिक समावेशक आणि वैविध्यपूर्ण कार्यबलाकडे होणाऱ्या व्यापक बदलाचे संकेत देते.
राज्यनिहाय योगदान :
वेतनपटाच्या राज्यनिहाय विश्लेषणावरून असे दिसून येते की निव्वळ वेतनपटवाढीमध्ये अव्वल पाच राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचा वाटा सुमारे 61.51% आहे, ज्यामुळे महिन्याभरात एकूण 13.46 लाख निव्वळ वेतनपट वाढ झाली आहे. सर्व राज्यांपैकी, महाराष्ट्र महिन्याभरात निव्वळ वेतनपटात 20.03% वाढ करून आघाडीवर आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांनी/केंद्रशासित प्रदेशांनी महिन्याभरात एकूण 5% पेक्षा जास्त निव्वळ वेतनपट वाढ नोंदवली.
एकूण सदस्यसंख्येपैकी, सुमारे 42.14% सदस्य तज्ज्ञ सेवांमधून आले आहेत, त्यापैकी मनुष्यबळ पुरवठादार सुमारे 51.31 % आहेत. शिवाय, तज्ञ सेवांचे पृथक्करण खालीलप्रमाणे आहे:
Sub-Classification of Expert Services
|
Net Payroll
|
EXPERT SERVICES (NOT CLASSIFIED)
|
126903
|
Manpower Suppliers
|
473277
|
Miscellaneous Activities
|
130925
|
Normal Contractors
|
90104
|
Security Services
|
101241
|
Total
|
922450
|
वरील वेतन पट आकडेवारी तात्पुरती आहे कारण डेटा निर्मिती ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया असून कर्मचाऱ्यांच्या नोंदी अपडेट करणे ही एक सतत प्रक्रिया आहे.
निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2158464)