जलशक्ती मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील गावे ‘ओडीएफ प्लस’जाहीर करण्‍यासाठी निकष आणि प्रक्रियेची माहिती

Posted On: 18 AUG 2025 4:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 ऑगस्ट 2025


देशातील सर्व गावांना ओपन डेफिकेसन फ्री (ओडीएफ) प्लस म्हणजेच उघड्यावर शौच करण्‍यापासून मुक्‍त गावे हा दर्जा देण्यासाठी गावे घोषित करण्यासाठी वापरण्‍यात प्रमुख निकषांची आणि प्रक्रियेची माहिती  खालीलप्रमाणे आहे: -

ओडीएफ प्लस गाव म्हणजे असे गाव की, ज्या गावाने ‘ओपन डेफिकेसन फ्री (ओडीएफ)’ दर्जा टिकवून ठेवला आहे तसेच त्या गावामध्‍ये  घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन सुनिश्चित केले जाते. याचबरोबर  गावामध्‍ये  स्वच्छता  असल्याचे दिसून येते. ‘ओडीएफ प्लस’  गावांचे 3 प्रगतीशील टप्पे आहेत:

  • ओडीएफ प्लस आकांक्षी : असे  गाव जे ‘ओडीएफ’ दर्जा टिकवून ठेवत आहे आणि त्या गावामध्‍ये घनकचरा व्यवस्थापन किंवा द्रव कचरा व्यवस्थापनासाठी व्यवस्था असते.  
  • ओडीएफ प्लस रायझिंग : असे गाव ज्याने ‘ओडीएफ’ दर्जा टिकवून ठेवला  आहे आणि घनकचरा व्यवस्थापन आणि द्रव कचरा व्यवस्थापन दोन्हीसाठी व्यवस्था केली आहे.
  • ओडीएफ प्लस मॉडेल: एक गाव जे ओडीएफ दर्जा टिकवून ठेवत आहे आणि घनकचरा व्यवस्थापन आणि द्रव कचरा व्यवस्थापन दोन्हीसाठी व्यवस्था करते; गावात  स्वच्छता असल्याचे दिसून येते, म्हणजेच कमीत कमी कचरा, कमीत कमी सांडपाणी, सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक कचरा टाकला जात नाही, याचे निरीक्षण केले जाते ; आणि ओडीएफ प्लस माहिती, शिक्षण आणि संप्रेषण (आयईसी) संदेश प्रदर्शित करते.

सर्व ओडीएफ प्लस निकष पूर्ण करणारे गाव ग्रामसभेत स्वतःला ओडीएफ प्लस घोषित करते.

एसबीएम (जी) म्हणजे स्वच्छ भारत मिशन- ग्रामीण अंतर्गत ऑनलाइन एकात्मिक व्यवस्थापन माहिती प्रणाली (आयएमआयएस) वर राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, 13ऑगस्ट, 2025  रोजी एसबीएम (जी) अंतर्गत ओडीएफ प्लस’ घोषित गावांची राज्य/केंद्रशासित प्रदेशानुसार संख्या खाली दिली आहे.

स्वच्छता हा राज्याचा विषय आहे, पेयजल आणि स्वच्छता विभाग राज्यांना आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य प्रदान करतो. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) [SBM(G)] चा दुसरा टप्पा 2020-21ते 2025-26 या कालावधीत राबविण्यात येत आहे, ज्यामध्ये उघड्यावर शौचमुक्ती (ODF) शाश्वततेवर लक्ष केंद्रित केले जात आहे आणि सर्व गावांमध्‍ये घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन व्यापक प्रमाणात केले जात  आहे म्हणजेच गावांना ओडीएफ वरून ओडीएफ प्लस (मॉडेल) मध्ये रूपांतरित केले जात आहे. शौचालय बांधण्याचे काम ही एक सतत प्रक्रिया आहे आणि एकदाच हे काम करून चालत नाही. कारण सतत नवीन कुटुंबे, स्थलांतरित कुटुंबे इत्यादींना शौचालयांचीआ वश्यकता असते, हे लक्षात घेऊन, नवीन वैयक्तिक गृहनिर्माण शौचालये (आयएचएचएल) बांधली जातात. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) च्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत एसबीएम(जी)निधीवरील प्रारंभिक शुल्क आहे आणि राज्यांनी शौचालयांसाठी नियोजन करावे आणि ही तफावत प्राधान्याने भरून काढावी, असा  सल्ला सातत्याने दिला जात आहे.

या संदर्भातील माहिती जलशक्ती राज्यमंत्री व्ही. सोमण्‍णा यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

State/UT-wise, No. of Open Defecation Free (ODF) Plus villages as on 13.08.2025

S. No.

State/UT Name

Total Village

ODF Plus Villages

Total ODF Plus villages

 

Aspiring

Rising

Model

 

 

1

A & N Islands

265

0

0

208

208

 

2

Andhra Pradesh

15,995

7,675

55

8,234

15,964

 

3

Arunachal Pradesh

5,134

3,153

847

956

4,956

 

4

Assam

25,368

1,363

876

22,947

25,186

 

5

Bihar

37,138

1,842

234

32,935

35,011

 

6

Chhattisgarh

19,643

972

34

17,707

18,713

 

7

D & N Haveli and Daman & Diu

98

0

0

94

94

 

8

Goa

373

58

2

308

368

 

9

Gujarat

17,973

3,514

919

13,331

17,764

 

10

Haryana

6,618

2,678

86

3,754

6,518

 

11

Himachal Pradesh

17,618

1,280

386

14,452

16,118

 

12

Jammu & Kashmir

6,216

20

17

5,959

5,996

 

13

Jharkhand

29,322

18,409

555

7,702

26,666

 

14

Karnataka

26,484

18,161

263

7,978

26,402

 

15

Kerala

1,435

6

5

1,370

1,381

 

16

Ladakh

240

10

0

230

240

 

17

Lakshadweep

10

0

0

10

10

 

18

Madhya Pradesh

51,043

247

4

50,521

50,772

 

19

Maharashtra

40,247

4,865

98

33,337

38,300

 

20

Manipur

2,567

41

1

26

68

 

21

Meghalaya

6,466

4,727

244

476

5,447

 

22

Mizoram

646

0

0

618

618

 

23

Nagaland

1,425

512

69

553

1134

 

24

Odisha

46,928

833

11

44,239

45,083

 

25

Puducherry

91

53

0

37

90

 

26

Punjab

11,977

9,701

69

2,012

11,782

 

27

Rajasthan

43,463

281

83

42,417

42,781

 

28

Sikkim

400

0

0

400

400

 

29

Tamil Nadu

11,739

535

25

11,009

11,569

 

30

Telangana

9,773

535

0

8,398

8,933

 

31

Tripura

765

8

0

757

765

 

32

Uttar Pradesh

96,174

1,054

80

93,502

94,636

 

33

Uttarakhand

14,967

52

1

14,864

14,917

 

34

West Bengal

38,343

4,357

241

32,580

37,178

 

 

 

5,86,944

86,942

5,205

4,73,921

5,66,068

 


निलीमा चितळे/सुवर्णा बेडेकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2157510)
Read this release in: English , Urdu