गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएचे उमेदवार म्हणून नामांकन मिळाल्याबद्दल केले अभिनंदन
सी. पी. राधाकृष्णन यांनी संसद सदस्य म्हणून तसेच विविध राज्यांचे राज्यपाल म्हणून पार पाडलेल्या भूमिकांनी घटनात्मक केलेल्या कर्तव्ये प्रभावीपणे पार पाडण्यात बजावली महत्त्वपूर्ण भूमिका
मला खात्री आहे की त्यांचा प्रचंड अनुभव आणि ज्ञान वरिष्ठ सभागृहाची प्रतिष्ठा वाढवेल आणि नवीन टप्पे गाठेल.
या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या संसदीय मंडळाच्या सर्व सदस्यांचे आभार.
Posted On:
17 AUG 2025 9:48PM by PIB Mumbai
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएचे उमेदवार म्हणून नामांकन मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
'एक्स' या समाज माध्यमावरील संदेशात अमित शाह म्हणाले की, संसद सदस्य म्हणून तसेच विविध राज्यांचे राज्यपाल म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांच्या भूमिकांनी संवैधानिक कर्तव्ये प्रभावीपणे पार पाडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मला खात्री आहे की त्यांचा प्रचंड अनुभव आणि ज्ञान वरिष्ठ सभागृहाची प्रतिष्ठा वाढवेल आणि नवीन टप्पे गाठेल. या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या संसदीय मंडळाच्या सर्व सदस्यांचे आभार.
***
JaydeviPujariSwami/ShraddhaMukhedkar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2157422)