पंतप्रधान कार्यालय
नागालँडचे राज्यपाल थिरु ला. गणेशन जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
Posted On:
15 AUG 2025 9:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागालँडचे राज्यपाल थिरु ला. गणेशन जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. थिरु ला. गणेशन जी यांनी आपले जीवन राष्ट्र सेवेला आणि राष्ट्र निर्माणाला वाहिले होते. त्यांचा परिचय एक कट्टर राष्ट्रभक्त असा केला जाईल, या शब्दामध्ये पंतप्रधानांनी थिरू ला. गणेशन जी यांचा गौरव केला.
‘एक्स’ या समाज माध्यमावरील संदेशात पंतप्रधानांनी लिहिले आहे:
“नागालँडचे राज्यपाल थिरु ला. गणेशन जी यांच्या निधनाने दुःख झाले. एक निष्ठावंत राष्ट्रवादी म्हणून ते कायम स्मरणात राहतील. त्यांनी आपले जीवन राष्ट्र सेवा आणि राष्ट्रनिर्माणासाठी समर्पित केले. त्यांनी संपूर्ण तामिळनाडूमध्ये भाजपाचा विस्तार करण्यासाठी कठोर परिश्रम केले. त्यांना तमिळ संस्कृतीबद्दलही खूप प्रेम होते. माझ्या सहवेदना त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांसोबत सदैव आहेत. ओम शांती.”
* * *
सुवर्णा बेडेकर/ श्रद्धा मुखेडकर/ दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2157033)