लोकसभा सचिवालय
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला लोकसभा अध्यक्षांनी देशवासियांनी दिल्या शुभेच्छा
Posted On:
14 AUG 2025 9:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2025
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या संदेशात बिर्ला म्हणाले, “माझ्या प्रिय देशबांधवांनो तसेच कोटा-बुंदीचे रहिवासी असलेल्या बंधू आणि भगिनींनो, मी तुम्हा सर्वांना 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो. 15 ऑगस्टचा हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या हृदयात अभिमान आणि आत्मसन्मानाची भावना जागृत करतो. या दिवशी आपण असे असंख्य स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि राष्ट्रनायक ज्यांच्या अविचल संघर्ष बलिदान आणि आत्मसमर्पणामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, त्यांना मनःपूर्वक अभिवादन करतो.
भारत आज जगातील सर्वात मोठी लोकशाही देश असून अग्रगण्य अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून उभा आहे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. आपण विज्ञान, वैद्यकशास्त्र, तंत्रज्ञान, अंतराळ आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रात जागतिक नेता म्हणून उदयास आलो आहोत. आजचा भारत आत्मसन्मान आणि आत्मनिर्भरतेसाठी ओळखला जातो. अत्यंत कष्टाने मिळवलेल्या या स्वातंत्र्याचे आपण रक्षण केले पाहिजे, त्याची प्रतिष्ठा राखली पाहिजे आणि भावी पिढ्यांसाठी अधिक समृद्ध राष्ट्र घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
एक काळ असा होता जेव्हा 40 कोटी भारतीयांनी त्यांच्या अथक परिश्रमाने स्वतंत्र भारताचे स्वप्न साकार केले होते. आज, मला विश्वास आहे की 140 कोटी भारतीय आपल्या एकत्रित प्रयत्नातून समृद्ध राष्ट्राचे स्वप्न पूर्ण होईल. या स्वातंत्र्यदिनानिमित्त आपण आपली सर्व कर्तव्ये प्रामाणिकपणे, निष्ठा आणि समर्पणाने पार पाडण्याची प्रतिज्ञा करूया.
या भावनेसह, मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो.
भारत माता की जय.”
* * *
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2156643)