संरक्षण मंत्रालय
येत्या स्वातंत्र्यदिन 2025 ला सशस्त्र दले, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, रेल्वे सुरक्षा दल तसेच राष्ट्रीय छात्रसेना वाद्यवृंदांच्या देशभक्तीपर सादरीकरणांनी दिल्लीचा आसमंत चैतन्याने सळसळणार
Posted On:
13 AUG 2025 8:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2025
देशाच्या 79 व्या स्वातंत्र्यदिन सोहोळ्यामध्ये राष्ट्रीय राजधानी दिल्ली शहरात महत्त्वाच्या ठिकाणी सशस्त्र दले, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ), रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) तसेच राष्ट्रीय छात्रसेना(एनसीसी) यांच्या वाद्यवृंदांच्या प्रत्यक्ष सादरीकरणाच्या मालिका अनुभवायला मिळणार आहेत. नागरिकांना प्रेरणादायक सूर आणि शिस्तबद्ध कलाविष्काराचा अनुभव घेण्याची संधी देऊ करत, हे सांगीतिक कार्यक्रम देशाच्या उत्सवी वातावरणाला लय आणि भव्यतेची जोड देतील.
या कार्यक्रमांची स्थळे आणि त्या ठिकाणी सादरीकरण करणारे संबंधित वाद्यवृंद यांची माहिती खाली दिली आहे:

SL NO
|
LOCATION
|
PERFORMANCE BY
|
1
|
INDIA GATE
|
INDIAN ARMY BAND
|
2
|
CENTRAL PARK CP
|
INDIAN NAVY BAND
|
3
|
KARTAVYA PATH
|
INDIAN AIR FORCE BAND
|
4
|
BUDDHA PARK NOIDA
|
INDIAN COAST GUARD
|
5
|
QUTUB MINAR
|
NATIONAL CADET CORPS BAND
|
6
|
VIJAY CHOWK
|
CENTRAL RESERVE POLICE FORCE BAND
|
7
|
PURANA QUILA
|
INDO TIBETAN BORDER POLICE BAND
|
8
|
RED FORT
|
CENTRAL INDUSTRIAL SECURITY FORCE BAND
|
9
|
KV SEC 8 RK PURAM
|
SASHASTRA SEEMA BAL BAND
|
10
|
NATIONAL POLICE MEMORIAL
|
BORDER SECURITY FORCE BAND
|
11
|
NIZAMUDDIN RAILWAY STATION
|
RAILWAY PROTECTION FORCE BAND
|
12
|
NEW DELHI RAILWAY STATION
|
RAILWAY PROTECTION FORCE BAND
|
एक समृद्ध परंपरा: लष्करी वाद्यवृंदांची भूमिका आणि त्यांचा इतिहास
भारतातील लष्करी वाद्यवृंदांची मुळे पार वसाहतवादी काळापर्यंत जाऊन पोहोचली असून, तेव्हापासून हे वाद्यवृंद हळूहळू उत्क्रांत पावत आता राष्ट्रीय ऐक्य आणि अभिमानाचे प्रतीक बनले आहेत. गेली अनेक दशके, लष्कर, नौदल, हवाई दल आणि इतर संबंधित सेनांचे वाद्यवृंद आपले राष्ट्रीय सोहळे, विजयोत्सव यासारख्या प्रसंगांचा अविभाज्य भाग झाले आहेत.
स्वातंत्र्यदिन 2025 चा सोहोळा: राष्ट्रीय ऐक्याचे बळकटीकरण
यावर्षीच्या सादरीकरणांसाठी पारंपरिक स्थळांच्या पलीकडे विचार करून दिल्लीतील सर्व प्रमुख सार्वजनिक जागा, बगिचे आणि सांस्कृतिक केंद्रांच्या ठिकाणी वाद्यवृंदांचे कार्यक्रम सादर करण्याच्या दृष्टीने आखण्यात आले आहेत. राष्ट्राभिमान आणि सामुहिक संबंधांची भावना उज्ज्वल करणारी राष्ट्रभक्तीपर गीते, युद्धाचे संगीत आणि अभिजात कलाकृतींच्या समृद्ध भांडारात प्रेक्षक हरवून जाणार आहेत.
सशस्त्र दले, सीएपीएफ, आरपीएफ तसेच एनसीसीच्या वाद्यवृंदांचे हे कार्यक्रम स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाचा गौरव करण्यासोबतच ऐक्य आणि देशभक्तीची भावना देखील अधिक बळकट करतील. या कार्यक्रमांमधील आनंदी तसेच उत्साहवर्धक संगीत आपल्या भारताचा वैविध्यपूर्ण वारसा आणि त्यांच्या संरक्षकांचे शिस्तबद्ध समर्पण यांची आठवण करून देणारे ठरेल.
दिल्लीत होणारे वाद्यवृंदांचे हे कार्यक्रम स्वातंत्र्यदिनाच्या सोहोळ्याचा आनंद वाढवण्याच्या देशव्यापी प्रयत्नांचा भाग आहेत. देशभरातील 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांतील 96 शहरांमध्ये विविध ठिकाणी वाद्यवृंदांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
अनुभवात सहभागी व्हा
संगीत आणि देशभक्तीच्या या अद्भुत संगमाचे साक्षीदार होण्यासाठी नागरिकांना आमंत्रित करण्यात आले आहे. इंडिया गेट असो किंवा कॅनॉट प्लेस असो किंवा इतर कोणते ठिकाण असो, वाद्यवृंदांचे आल्हाददायक स्वर आणि दमदार लय स्वातंत्र्यदिन 2025 चा सोहोळा अविस्मरणीय करतील. स्वातंत्र्यदिनी संध्याकाळी 5 वाजता या वाद्यवृंदांचे सादरीकरण सुरु होईल.
देशाभिमानाच्या सुरांनी दिल्ली दुमदुमत असताना- प्रत्येकाच्या हृदयात स्वातंत्र्याची उर्जा सळसळती राहो !
* * *
निलिमा चितळे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2156203)