इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
आधार चेहेरा प्रमाणीकरण उपक्रमाने नवा टप्पा गाठला, केवळ 6 महिन्यांमध्ये 100 कोटींवरून 200 कोटी व्यवहारांपर्यंत मजल
Posted On:
11 AUG 2025 10:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑगस्ट 2025
येत्या स्वातंत्र्यदिनी, कागदपत्रांपासून स्वातंत्र्य केवळ एका दृष्टीक्षेपात शक्य. आधार चेहेरा प्रमाणीकरणामुळे आधार धारकांना त्यांची ओळख तात्काळ, सुरक्षितपणे आणि कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी आणि तेही कोणत्याही कागदपत्राशिवाय प्रमाणित करणे शक्य झाले आहे.
सुरळीत, निर्धोक आणि कागदविरहित प्रमाणीकरणाच्या दिशेने भारताची सुरु असलेली जलद वाटचाल प्रदर्शित करत, दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी, युआयडीएआय म्हणजेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात आधार प्राधिकरणाने चेहेरा प्रमाणीकरण प्रणालीत 200 कोटी व्यवहारांचा महत्त्वाचा टप्पा साजरा केला.
या नव्या पद्धतीच्या स्वीकाराचा वेग गुणाकाराने वाढत आहे. 2024 च्या मध्यात या नव्या प्रणालीत 50 कोटी व्यवहार झाले. ही संख्या जानेवारी 2025 पर्यंत, केवळ पाच महिन्यांच्या अवधीत दुप्पट होऊन 100 कोटींपर्यंत पोहोचली. त्यानंतर सहा महिन्यांहून कमी कालावधीत हीच संख्या पुन्हा दुप्पट होऊन 200 कोटींच्या महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत पोहोचली.
या यशस्वी कामगिरीबद्दल बोलताना आधार प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार म्हणाले, “इतक्या कमी काळात आधार चेहेरा प्रमाणीकरण प्रणालीमध्ये 200 कोटी व्यवहार होणे रहिवासी तसेच सेवा प्रदात्यांचा आधारच्या सुरक्षित, समावेशक तसेच नाविन्यपूर्ण प्रमाणीकरण परिसंस्थेवर असलेला विश्वास आणि भरवसा अधोरेखित करते. सहा महिन्यांपेक्षा कमी वेळात 100 कोटी व्यवहारांकडून 200 कोटी व्यवहारांकडे झालेला हा प्रवास म्हणजे या प्रणालीची वृद्धीची क्षमता आणि देशाची डिजिटल सज्जता यांचा पुरावा आहे.” ते पुढे म्हणाले, “गावांपासून ते मेट्रोपर्यंत आधार प्राधिकरण सरकारे, बँका आणि सेवा प्रदात्यांसह सामर्थ्य जोडून घेऊन आणि प्रत्येक भारतीय नागरिकाला तातडीने, सुरक्षितपणे आणि कोणत्याही ठिकाणाहून त्यांची ओळख सिध्द करण्यासाठीची क्षमता प्राप्त करून देऊन आधार चेहेरा प्रमाणीकरण प्रणालीला मोठे यश मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे.”
केवळ सहा महिन्यांत आधार चेहेरा प्रमाणीकरणविषयक व्यवहारांच्या संख्येत 100 कोटींपासून 200 कोटींपर्यंत झालेली जलद वाढ डिजिटल भारताची मध्यवर्ती संकल्पना दर्शवतानाच देशाचे डिजिटली सक्षम समाजात आणि ज्ञानपूर्ण अर्थव्यवस्थेत परिवर्तन सुचवते. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात त्वरित, सुरक्षित आणि कागदविरहित ओळख पडताळणी शक्य करून आधार प्राधिकरण डिजिटल राज्यकारभाराचा कणा मजबूत करत आहे. हा महत्त्वाचा टप्पा केवळ संख्यांच्या संदर्भात महत्त्वाचा नाही तर तो समावेशक तंत्रज्ञान जेव्हा कार्यक्षम पद्धतीने वापरली जाते तेव्हा ती कशा पद्धतीने विभाजने सांधते, नागरिकांना सक्षम करते आणि खऱ्या अर्थाने जोडलेल्या तसेच आत्मविश्वासपूर्ण डिजिटल भविष्याच्या दिशेने भारताची वाटचाल अधिक वेगवान करते याचा पुरावाच आहे.
* * *
निलिमा चितळे/संजना चिटणीस/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2155339)