पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतातील वैद्यकीय पर्यटन

Posted On: 07 AUG 2025 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 ऑगस्‍ट 2025

 

भारतात वर्ष 2025 मध्ये (एप्रिल पर्यंत) वैद्यकीय उद्देशाने आलेल्या परदेशी पर्यटकांची एकूण संख्या 1,31,856, असून ती या कालावधीतील एकूण परदेशी पर्यटकांच्या अंदाजे 4.1% आहे.

गेल्या पाच वर्षांत वैद्यकीय पर्यटकांच्या संख्येत सर्वोच्च वाढ दर्शवणारे देश परिशिष्टात दिले आहेत.

वैद्यकीय पर्यटनासह पर्यटन स्थळे आणि उत्पादनांना चालना देणे आणि त्यांचा विकास करणे हे संबंधित राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेश प्रशासनाद्वारे केले जाते. वैद्यकीय पर्यटनसह इतर पर्यटन निगडित उत्पादने विकसित करुन आणि त्यांना प्रोत्सहन देऊन मंत्रालय राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नांना विविध योजना आणि उपक्रमांनी जोड देते.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे वैद्यकीय पर्यटनाच्या परिसंस्थेत सेवा प्रदाते, सुविधा पुरवणारे, रुग्णालये, हॉटेल्स आणि विमानसेवांसारख्या वाणिज्यिक आस्थापना, नियामक संस्था आणि सरकार यांचा समावेश होतो. रुग्णालये, सार्वजनिक संस्था आणि व्यापारी संस्थांच्या मदतीने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय 'हील इन इंडिया' धोरणाच्या प्रचारासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या तत्त्वावर क्षमता निर्माण करण्यासाठी आवश्यक पावले उचलते.

याशिवाय परदेशी नागरिकांनी भारतात वैद्यकीय उपचारांसाठी यावे याकरता भारत सरकारने 171 देशांच्या नागरिकांना ई-मेडिकल व्हिसा/ई-मेडिकल अटेंडंट व्हिसा सुविधा दिली आहे.

राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार विपणन आणि विक्री वाढवणे आणि जनजागृती करण्यासाठी गुजरात प्रादेशिक वेलनेस रिट्रीट्सशी सहयोग करते.

याशिवाय, गुजरातचा वैद्यकीय संपर्क कार्यक्रम खालील उपायांद्वारे वैद्यकीय पर्यटनाला सक्रियपणे प्रोत्साहन देऊन भारताच्या आरोग्य धोरणात योगदान देतो:

  • गुजरातच्या आरोग्यसेवांविषयक पायाभूत सेवा सुविधा आणि वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्टतेचे जागतिक स्तरावर सादरीकरण.
  • आंतरराष्ट्रीय रुग्णांसाठी सेवा गुणवत्ता वाढविण्यासाठी पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे.
  • जागतिक आरोग्य आणि निरामय कार्यक्रम, प्रदर्शने, परिषदा आणि चर्चासत्रांमध्ये सहभागी होणे आणि त्यांचे आयोजन करणे.

केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज राज्यसभेत ही माहिती एका लेखी उत्तरात दिली.

 

* * *

निलिमा चितळे/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2153910)