अर्थ मंत्रालय
अटल पेन्शन योजनेने (APY) गाठला एक महत्त्वाचा टप्पा, एकूण नोंदणी 8 कोटींपेक्षा अधिक
प्रविष्टि तिथि:
25 JUL 2025 5:44PM by PIB Mumbai
भारत सरकारच्या प्रमुख सामाजिक सुरक्षा योजनांपैकी एक असलेल्या आणि निवृत्तीवेतन नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे (PFRDA) अटल पेन्शन योजनेने (APY) एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. चालू आर्थिक वर्षात (आर्थिक वर्ष 2025-26) 39 लाख नवीन सदस्यांची नोंदणी होऊन एकूण नोंदणी 8 कोटींच्या पुढे गेली आहे. ही योजना 9 मे 2015 रोजी सुरू झाली होती आणि यंदा आपली दशकपूर्ती साजरी करत असताना योजनेने हा टप्पा गाठला आहे.
सर्व भारतीयांसाठी एक सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा प्रणाली तयार करण्याच्या दृष्टिकोनातून सुरू केलेली, अटल पेन्शन योजना ही एक स्वेछिक निवृत्तीवेतन योजना आहे, जी गरीब, वंचित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांवर लक्ष केंद्रित करते. या यशाचे श्रेय सर्व बँका, टपाल विभाग (DoP) आणि राज्यस्तरीय बँकर्स समिती/केंद्रशासित प्रदेश स्तरीय बँकर्स समिती (SLBCs/UTLBCs) आणि भारत सरकारच्या सातत्यपूर्ण पाठबळाला जाते. निवृत्तीवेतन नियामक आणि विकास प्राधिकरणाने नोंदणी वाढवण्यासाठी जनजागृती कार्यक्रम, प्रशिक्षण, बहुभाषिक माहितीपत्रके, प्रसारमाध्यम मोहिमा आणि नियमित पुनरावलोकनांद्वारे सक्रिय भूमिका बजावली आहे.
अटल पेन्शन योजनेची रचना विशेषत्वाने 'संपूर्ण सुरक्षा कवच' (संपूर्ण सुरक्षा कवच) प्रदान करण्यासाठी केली आहे. ही योजना सदस्याला वयाच्या 60 वर्षानंतर 1,000 ते 5,000 रुपयांपर्यंत पर्यंत मासिक निवृत्तीवेतनाची हमी देते. सदस्याच्या निधनानंतर त्याच्या जोडीदाराला समान निवृत्ती वेतन आणि दोघांच्या मृत्यूनंतर नामनिर्देशित व्यक्तीला संपूर्ण जमा झालेला निधी परत दिला जातो. ही योजना 18 ते 40 वर्षे वयोगटातील सर्व भारतीय नागरिकांसाठी खुली आहे, मात्र जे नागरिक प्राप्तीकर दाता आहेत किंवा ज्यांनी पूर्वी प्राप्तीकर भरलेला आहे त्यांना या योजनेत सामील होता येणार नाही.
"APY का साथ है तो जीवन का सुरक्षा कवच साथ है”
“एपीवाय’ची सोबत असेल तर जीवनाचे सुरक्षा कवच सोबत आहे”
***
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2148714)
आगंतुक पटल : 18