संरक्षण मंत्रालय
आत्मनिर्भर भारत: संरक्षण मंत्रालय आणि बीईएल यांच्यात लष्करासाठी हवाई संरक्षण अग्नि नियंत्रण रडार खरेदीकरिता 2000 कोटी रुपयांचा करार
प्रविष्टि तिथि:
25 JUL 2025 3:16PM by PIB Mumbai
संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्करासाठी हवाई संरक्षण अग्नि नियंत्रण रडार खरेदी करण्यासाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल ) समवेत सुमारे 2000 कोटी रुपयांचा करार केला आहे. हा करार खरेदी (भारतीय-स्वदेशात आरेखित, विकसित आणि उत्पादित केलेले) श्रेणी अंतर्गत करण्यात आला आहे. 25 जुलै 2025 रोजी नवी दिल्ली येथे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत संरक्षण मंत्रालय आणि बीईएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या करारावर स्वाक्षरी केली आणि करारपत्राची देवाणघेवाण केली.

किमान 70% स्वदेशी सामग्री असलेले, हे अग्नि नियंत्रण रडार लढाऊ विमाने, आक्रमणासाठी उपयोगात येणारी हेलिकॉप्टर्स आणि शत्रूचे ड्रोन यासह सर्व प्रकारच्या हवाई धोक्यांचा शोध घेण्यास सक्षम असतील. हा करार भारतीय लष्कराच्या हवाई संरक्षण रेजिमेंटच्या आधुनिकीकरणात एक महत्त्वाचा टप्पा ठरेल आणि भारतीय सैन्याच्या कार्य सज्जतेत वाढ करेल, तसेच देशाच्या आर्थिक विकासातही मोलाचे योगदान देईल.
ही खरेदी भारतातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योजकांना प्रोत्साहन देणारी असून स्वदेशी संरक्षण उत्पादन कंपन्यांना सक्षम करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या माध्यमातून सुटे भाग आणि कच्चामाल तयार करणाऱ्या स्वदेशी उद्योगांना संधी मिळणार आहे.
***
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2148426)
आगंतुक पटल : 7