दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
ग्रामीण भागांतील इंटरनेट जोडणी सुधारण्यासाठी केलेल्या उपाययोजना
Posted On:
24 JUL 2025 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जुलै 2025
श्रेणी -2 आणि श्रेणी -3 अंतर्गतच्या शहरांमध्ये हाती घेण्यात आलेल्या प्रमुख उपक्रमांचा तपशील खाली नमूद केला आहे :
तंत्रज्ञानविषयक शोध, विकास आणि तंत्रज्ञानविषयक प्रगतीसाठी तंत्रज्ञान विषयक स्टार्टअपची व्याप्ती 1600 पर्यंत वाढवण्यासाठी येत्या पाच वर्षांतील 490 कोटी रुपयांच्या खर्चासह नवोन्मेषी स्टार्टअपसाठी भावी पिढ्यांच्या स्वरुपातील पाठबळ (Gen-Next Support for Innovative Startups - GENESIS)
रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि 104 लहान शहरे/गावांमध्ये 246 युनिट्स स्थापन करून माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाधारीत सेवांचा विस्तार करण्याच्या उद्देशाने भारत व्यवसाय प्रक्रिया बाह्यस्रोत प्रोत्साहन योजना आणि ईशान्य व्यवसाय प्रक्रिया बाह्यस्रोत प्रोत्साहन योजना सुरु केल्या गेल्या.
भारतीय सॉफ्टवेअर तंत्रज्ञान पार्क या उपक्रमांतर्गत श्रेणी -2 आणि श्रेणी -3 अंतर्गतच्या शहरांमधील 59 केंद्रांसह 67 केंद्रांची स्थापना
मार्च 2025 पर्यंत, भारतात एकूण 969.10 दशलक्ष इंटरनेट ग्राहक आहेत, यांपैकी, 407.69 दशलक्ष इंटरनेट ग्राहक हे ग्रामीण भागांतले आहेत. देशातील एकूण इंटरनेट ग्राहकांची संख्या मार्च 2021 मध्ये 825.30 दशलक्ष होती, त्यात वाढ होऊन मार्च 2025 मध्ये ती 969.10 दशलक्षपर्यंत पोहोचली आहे. ग्रामीण भागांमधील इंटरनेट जोडणी सुधारण्यासाठी, केंद्र सरकारने देशभरातील इंटरनेट नसलेल्या गावांमध्ये 4G मोबाईल सेवा पुरवण्यासाठी 4G सॅचुरेशन प्रोजेक्ट्स हा प्रकल्प आणि उच्च वेगाची ब्रॉडबँड सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सुधारित भारतनेट कार्यक्रमही सुरू केला आहे.
केंद्रीय दूरसंवाद आणि ग्राम विकास राज्यमंत्री डॉ. पेम्मासानी चंद्र शेखर यांनी आज राज्यसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.
निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2148112)