नवी दिल्ली, 24 जुलै 2025
भारतामध्ये ऑलम्पिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी ची बोली लावणे ही भारतीय ऑलिम्पिक संघटनेची (IOA) जबाबदारी आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (IOC) एका विस्तृत निवड प्रक्रियेद्वारे ऑलिंपिक स्पर्धेचे यजमानपद प्रदान करते. ही यजमान निवड प्रक्रिया आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या या संकेतस्थळावर सार्वजनिक स्वरूपात उपलब्ध आहे.
https://www.olympics.com/ioc/becoming-an-olympic-games-host/the-process-to-elect olympic-hosts
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडे यजमानपदासाठीचे इरादा पत्र सादर केले आहे. सध्या ही निविदा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या भविष्यातील यजमान आयोगासोबत "सतत संवाद" टप्प्यात आहे.
या सतत संवाद प्रक्रियेतील अलीकडील संवादादरम्यान भारताच्या 2036 ऑलिंपिक स्पर्धा आयोजित करण्यासंदर्भातील तीन महत्त्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला आहे - 1. प्रशासन व्यवस्था. 2. अँटी डोपिंग उपाययोजना. 3. भारताची मागील ऑलंपिक स्पर्धांमधील कामगिरी.
सरकारने या मुद्द्यांवर आवश्यक सुधारणा राबवून उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये क्रीडा संस्थांमध्ये सुशासन, न्याय खेळ वातावरण आणि खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करता यावी यासाठी पाठबळ देण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
ही माहिती युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai