सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संसद प्रश्नोत्तरे: अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

Posted On: 23 JUL 2025 10:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 जुलै 2025

 

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी  पोस्ट मॅट्रिक मिळणारी शिष्यवृत्ती (पीएमएस) आणि उच्च दर्जाच्या शिक्षणाच्या योजनांद्वारे प्रदान करण्यात येणारी आर्थिक मदत यामुळे देशातील शैक्षणिक संस्था/महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षण घेत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यास हातभार लागला आहे.

यामुळे केवळ आर्थिक भार कमी होण्यास मदत झाली नाही तर अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदत झाली आहे. या योजनांनी शैक्षणिक संधी सुधारून,सामाजिक-आर्थिक गतिशीलता वाढवली आहे, करिअरच्या संधी वाढवल्या आहेत आणि अनुसूचित जाती समुदायांमधील आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणा दूर केला आहे.

गेल्या पाच वर्षांत, अनुक्रमे 2,22,31,139 आणि 20,340 अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना आणि उच्च दर्जाच्या शिक्षण योजनेचा लाभ मिळाला आहे.

या योजनांतर्गत अनुसूचित जातीचे  विद्यार्थी आयआयटी, आयआयएम, आयआयआयटी, एम्स, एनआयटी, एनआयएफटी, एनआयडी, आयएचएम, एनएलयू यासारख्या महाविद्यालये, विद्यापीठे आणि संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत आणि त्यांच्या संबंधित क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत आहेत .

ही माहिती केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री  रामदास आठवले यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

 

* * *

शैलेश पाटील/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2147617)