गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नवी दिल्लीत भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये गृहसचिव स्तरावरील चर्चा

Posted On: 23 JUL 2025 9:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 23 जुलै 2025

 

भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये गृहसचिव स्तरावरील चर्चा 22 जुलै 2025 रोजी नवी दिल्लीत झाली. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व भारत सरकारचे गृहसचिव गोविंद मोहन यांनी केले तर नेपाळी शिष्टमंडळाचे नेतृत्व नेपाळ सरकारचे गृहसचिव गोकर्ण मनी दुवादी यांनी केले. चर्चेदरम्यान दोन्ही पक्षांनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्य आणि सीमा व्यवस्थापन यांचा चौफेर वेध घेतला आणि ते अधिक बळकट करण्यावर सहमत झाले.

  

सीमेवरच्या खांबांची दुरुस्ती आणि देखभाल तसेच दोन्ही सीमांपार होणाऱ्या गुन्हेगारी स्वरूपाच्या हालचाली, सीमेवरच्या जिल्ह्यांच्या समन्वय समित्या, सीमेवरील पायाभूत सुविधा विशेषतः ICPs, रस्ते आणि रेल्वेचे जाळे, विकास तसेच विविध संरक्षणाशी संबंधित संस्थाची क्षमता वृद्धी आणि आपत्कालीन धोके टाळण्याच्या दृष्टीने सहकार्य वाढवण्यासंबंधीचे मार्ग या सर्व गोष्टी या चर्चेमध्ये समाविष्ट होत्या. गुन्हेगारी संदर्भातील कामांमध्ये परस्परसंमत वकिली सहकार्य कराराच्या मसुद्याला अंतिम स्वरूपाबद्दल दोन्ही बाजूंनी समाधान व्यक्त केले त्याचबरोबर सुधारित प्रत्यार्पण कराराचा निष्कर्ष काढण्यावरही त्यांचे एकमत झाले.

पुढील गृहसचिव स्तरावरील चर्चा दोन्ही बाजूंना सोयीस्कर असेल त्या तारखेला नेपाळमध्ये घेण्यासंबंधी यावेळी एकमत झाले.

 

* * *

शैलेश पाटील/विजया सहजराव/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2147596)