संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी (जीआरएसई) उपक्रमांतर्गत शेवटचे जहाज यार्ड 3034 (अजय) चे जलावतरण

प्रविष्टि तिथि: 21 JUL 2025 10:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 जुलै 2025

गार्डन रीच शिपबिल्डर्स ॲन्ड इंजिनीयर्स (जीआरएसई) द्वारे स्वदेशी  आरेखित आणि निर्मित पाणबुडी विरोधी उथळ पाण्यात चालणारी  युद्ध नौका (एएसडब्ल्यू एसडब्ल्यूसी) या श्रेणीतील आठवे आणि शेवटचे जहाज, यार्ड 3034 (अजय) चे 21 जुलै 2025 रोजी जीआरएसई कोलकत्याचे चीफ ऑफ मटेरियल (सीओएम) व्हॉइस ऍडमिरल किरण देशमुख यांच्या उपस्थितीत जलावतरण करण्यात आले. नौदलाच्या परंपरेनुसार प्रिया देशमुख यांच्या हस्ते जहाजाचे जलावतरण झाले. याप्रसंगी भारतीय नौदल आणि जी आर एस ई मधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अर्नाळा श्रेणीतील पहिले जहाज 18 जून 2025 रोजी नौदलात सामील करण्यात आले होते. दुसरे जहाज ऑगस्ट 2025 मध्ये नौदलात सामील करण्याची योजना आहे. ही युद्धनौका भारतीय नौदलाची समुद्रातील सतर्कता, पाणबुडी विरोधी युद्धक्षमता आणि बारुदी सुरंग टाकण्याची क्षमता वाढवेल. हे जहाज भूमिका निर्धारित करणारे सेंसर्स जसे की - हल माउंटेन सोनार आणि लो फ्रिक्वेन्सी व्हेरिएबल सोनार ( एलएफडीसी) ने सुसज्ज आहे तसेच याची मारा करण्याची क्षमता अत्याधुनिक टॉरपिडो, पाणबुडी विरोधी क्षेपणास्त्र, एन एस जी -30 बंदूक आणि 12.7 मिमी एस आर सी जी यामुळे वाढलेली आहे. हे जहाज डिझेल इंजिन वर चालणारे असून वॉटरजेट द्वारे संचलित आहे.

जहाज बांधणी, शस्त्रास्त्रे, सेन्सर्स आणि अद्ययावत संपर्क तसेच इलेक्ट्रॉनिक युद्धप्रणालीमध्ये आत्मनिर्भरता मिळवण्याच्या भारतीय नौदलाच्या निरंतर प्रयत्नांमध्ये अजय नोकरीचे जलावतरण एक महत्त्वाचा टप्पा आहे. 80 टक्के होऊन अधिक स्वदेशी सामग्रीतून तयार करण्यात आलेले हे जहाज भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाचे प्रतीक आहे. ही नौका हिंद महासागर क्षेत्रात आपल्या राष्ट्राच्या समुद्र हिताची सुरक्षा करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 


(रिलीज़ आईडी: 2146648) आगंतुक पटल : 12
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Tamil